
भगतसिंग कोश्यारी यांना कोरोना,राजभवन क्वारंटाईन…
मुंबई – महाराष्ट्रात पुन्हा एकदा कोरोनाबाधित (Corona) रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. त्यामुळे राज्यात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. या विषाणूचा फटका सर्वसामांन्यांपासून, बॉलिवूड कलाकार, मालिका विश्वातील अभिनेते-अभिनेत्री तसेच बड्या नेत्यांना देखील बसला आहे. त्यातच आता राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना कोरोनाची लागण झाली आहे. कोश्यारी यांना मुंबईतील गिरगाव येथील रिलायन्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
राज्यपाल यांच्या प्रकृतीबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आली नाही. राज्यपालांना आज सकाळी 9.15 वाजण्याच्या सुमारास रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
दरम्यान, सध्या राज्यात राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. अशातच एकनाथ शिंदे आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना भेटण्यासाठी येणार होते. मात्र राज्यपाल यांना कोरोनाची लागण झाली आहे आहे त्यामुळे शिंदे आता नेमकं कोणतं पाऊल उचलतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
आणखीन काही महत्त्वाचे
आनंदी जीवन फाउंडेशनच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार तर १२० विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप..
दौंड:- आलिम सय्यद, दौड तालुक्याच्या पश्चिम भागातील जावजीबुवाची वाडी येथील प्राथमिक शाळेतील इयत्ता १ ली ते इयत्ता ७ वी मधील...
जव्हार मर्चंट नागरी सहकारी (पतसंस्था) .बँक निवडणुकीची मतदार सभासदांची यादी जाहीर…
जव्हारचे राजे श्रीमंत यशवंतराव मुकणे महाराजांनी स्थापन केलेली जव्हार अर्बन बँक . आज या बँकेला १०० वर्षे पूर्ण होऊन गेले...
पौष्टिक तृणधान्य आहारात गरजेचे – राहुल माने..
दौंड:- आलिम सय्यद, दौंड तालुक्यातील पांढरेवाडी येथे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2022-23 निमित्त पौष्टिक तृणधान्य लागवड व त्याचे आहारातील महत्व...
विकास आराखडा लोकांच्या हिताचा कि एका अविचारी डोक्याचा..
जव्हार नगरपरीषदेच्या अध्यक्ष आणि सदस्यांचा कार्यकाळ दोनचार दिवसात संपुष्टात येत आहे . त्यामुळे आपल्याला हवे तेच करुन घेण्यासाठी धावपळ वाढलेली...
महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सोमवार, दि.19 डिसेंबरपासून नागपूर येथे सुरु..
महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सोमवार, दि. 19 डिसेंबरपासून नागपूर येथे सुरु होणार आहे. दिनांक 19 ते 30 डिसेंबर या कालावधीत...
संतापजनक विधान करणाऱ्या पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचा कुरकुंभ येथे निषेध नोंदवण्यात आलाय..
महापुरुषांनी भीक मागून शिक्षण संस्था सुरू केल्या असे संतापजनक विधान करणाऱ्या पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचा कुरकुंभ येथे निषेध नोंदवण्यात आलाय...