
डाँक्टर डे दिनानिमित्त दौंड,कुरकुंभ,पाटस येथील डाॅक्टरांसाठी वाॅकेथाॅन चे आयोजन
दौंड:- आलिम सय्यद
आज दिनांक १ जुलै रोजी रोटरी क्लब ऑफ दौंड, रोटरी क्लब कुरकुंभ एम आय डी सी,रोटरी क्लब ऑफ पाटस, ज्युपीटर हाॅस्पीटल पुणे,दौंड मेडीकल असोशिएशन व रोटरॅक्ट क्लब ऑफ दौंड काॅलेज यांचे संयुक्त विद्यमाने डाँक्टर डे दिन निमित्त दौंड,कुरकुंभ,पाटस येथील डाॅक्टरांसाठी वाॅकेथाॅन चे आयोजन करण्यात आले
या स्पर्धेमध्ये सुमारे १६० डाॅक्टरांनी सहभाग नोंदवला
दौंड येथील राज्य राखीव पोलीस दल मैदानावर या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले
विजयी स्पर्धकांना राज्य राखीव पोलीस दल पोलीस ग्रुप ७ चे सहायक समादेशक शिंदे साहेब,गवारी साहेब,पोलीस कल्याण विभाग चे निरिक्षक डहाळे साहेब ,रोटरी क्लब ऑफ दौंड चे अध्यक्ष डॉ राजेश दाते यांच्या शुभहस्ते पदक पारितोषिक वितरण करण्यात आले
ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी रोटरी क्लब ऑफ दौंड चे सर्व सदस्य,दौंड मेडीकल असोशिएशन,रोटरॅक्ट क्लब चे सर्व सदस्य यांनी विशेष सहकार्य केले
समाजासाठी अहोरात्र सेवा बजावणारे डाॅक्टरांचे आरोग्य सदृढ रहावे यासाठी या स्पर्धेचे विशेष आयोजन करण्यात आले असे रोटरी क्लब ऑफ दौंड चे अध्यक्ष डॉ राजेश दाते यांनी सांगीतले
सर्व सहभागी स्पर्धक ,स्पर्धेसाठी सहकार्य करणारे सर्वांचे विशेष आभार रोटरी क्लब ऑफ दौंड चे सचिव अमीर शेख यांनी व्यक्त केले. यावेळी रोटरी क्लब ऑफ दौंड, रोटरी क्लब कुरकुंभ एम आय डी सी,रोटरी क्लब ऑफ पाटस, ज्युपीटर हाॅस्पीटल पुणे,दौंड मेडीकल असोशिएशन व रोटरॅक्ट क्लब ऑफ दौंड काॅलेज चे पदाधिकारी उपस्तिथ होते
आणखीन काही महत्त्वाचे
ऑक्टोबर -२०२३ रोजी स्वच्छता अभियाना दिवशी पोलीस निरीक्षक संजय कुमार ब्राह्मणे यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छता मोहीम शहरात राबविण्यात आली…
१ ऑक्टोबर -२०२३ रोजी स्वच्छता अभियाना दिवशी पोलीस निरीक्षक संजय कुमार ब्राह्मणे यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छता मोहीम शहरात राबविण्यात आली... भारताचे...
पाथर्डी ग्रामपंचायत मधील डोंगरपाडा येथे अवकाळी पावसाने १४ घराचे मोठ्या प्रमाणात नुकसान..
पाथर्डी ग्रामपंचायत मधील डोंगरपाडा येथे अवकाळी पावसाने १४ घराचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले . बहुजन विकास आघाडीचे जव्हार तालुका अध्यक्ष...
गुंड प्रवृत्तीचे परप्रांतीयांकडून आदिवासी ग्रामसेवकाला बेदम मारहाण ..
गुंड प्रवृत्तीचे परप्रांतीयांकडून आदिवासी ग्रामसेवकाला बेदम मारहाण .. जव्हार शहरात बस स्टॅन्ड परिसरात परप्रांतीय लोकांचे फुलांचे मार्केट आहे..... या मार्केटमध्ये...
भारताचे यशस्वी पंतप्रधान मा. श्री नरेंद्र मोदीजी यांच्या ७४व्या वाढदिवसा निमित्त…
भारताचे पंतप्रधान यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन भारताचे यशस्वी पंतप्रधान मा. श्री नरेंद्र मोदीजी यांच्या ७४व्या वाढदिवसा निमित्त... सेवा पंधरवडा...
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन
भारताचे पंतप्रधान यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन भारताचे यशस्वी पंतप्रधान मा. श्री नरेंद्र मोदीजी यांच्या ७४व्या वाढदिवसा निमित्त सेवा पंधरवडा...
109 न दिल्यास गाळपाची परवानगी नाही साखर आयुक्त
नेवासा प्रतिनिधी सन 2021 22 मध्ये गळीत हंगामातील कपात केलेले १०९ रुपये शेतकऱ्यांना न दिल्यास लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर...