हार्मोनि ऑरगॅनिक्स कंपनीमध्ये केमिकल ची चोरी…

दौंड:- आलिम सय्यद

दौंड तालुक्यातील कुरकुंभ औद्योगिक वसाहत मधील हार्मोनि ऑर्गनिक्स प्रा. लि. प्लॉट नं डी-५ या कंपनी मधून केमिकल पावडर ची चोरी झाल्याचा प्रकार घडलाय.
कुरकुंभ औद्योगिक वसाहत मधील चोरीचे सत्र सुरूच आहे. हार्मोनि ऑर्गनिक्स कंपनीतून २६ जून रात्री ते २७ जून सकाळच्या दरम्यान पॅलेडीयम कॅटलिस्ट या नावाची पावडर साधारण ४७ लाख २७ हजार २५० रुपयांचे केमिकल चोरी झाली असल्याची फिर्याद कंपनीचे स्टोअर मॅनेजर दीपक चौधरी( वय ५६ ) वर्ष रा. बारामती, यांनी दौंड पोलीस ठाण्यात दिली आहे. याप्रकरणी अज्ञात चोरट्याविरुद्ध दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये पॅलेडीयम कॅटलिस्ट साधारण २६ किलो व कॅटलिस्ट १०१ नावाचे १७ किलो वजनाचे केमिकल साधारण ४७ लाख २७ हजार २५० रुपयांचे केमिकल चोरी झाली सदरची पावडर ही वेगवेगळे सीलबंद निळ्या रंगाच्या डब्यात ठेवले होते. हे केमिकल ड्रम या ठिकाणी दिसून न आल्याने हे केमिकल पावडर चोरी झाले असल्याचे दिसून आले. सदरचा तपास पोलीस सहाय्यक फौजदार श्रीरंग शिंदे करत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!