स्वःपत्रकार रोहिदास दातीर यांच्या कुटुंबाला पोलीस संरक्षण..

शेख युनुस

दक्ष पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष रोहिदास दातीर यांचे अपहरण करून हत्या करण्यात आली. या घटनेनंतर दातीर कुटुंबाला धोका असल्याचे त्यांच्या पत्नी सविता दातीर यांनी पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांचेकडे संरक्षण मिळावे अशी मागणी केली होती. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन ११एप्रिल २०२१ ला दातीर कुटुंबाला संरक्षण देण्यात आले. राहुरी तालुका पोलीस निरीक्षक नंदकुमार दुधाळ यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक गणेश शेळके यांनी भेट देऊन पोलीस संरक्षणाची पाहणी केली. रोहिदास दातीर यांच्या कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी सहकार्य मिळेल अशी प्रतिक्रिया राज्य मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी व्यक्त केली. दातीर कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्नशील आहे हिच पत्रकार रोहिदास दातीर यांना श्रध्दांजली समजली जाईल. महाराष्ट्र राज्य मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!