केंद्रीय पत्रकार संघाच्या वतीने आरोग्य मंत्री टोपे कोरोना योद्धा पुरस्काराने सन्मानित..

केंद्रीय पत्रकार संघाच्या वतीने आरोग्य मंत्री टोपे कोरोना योद्धा पुरस्काराने सन्मानित

जालना – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील आरोग्य परिस्थिती कौशल्याने हाताळल्या बद्दल आरोग्य मंत्री डॉ. राजेश टोपे यांचा केंद्रीय पत्रकार संघाच्या वतीने कोराना योद्धा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.

केंद्रीय पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष संदीप कसालकर यांच्या आदेशाने आरोग्य मंत्री डॉक्टर राजेश टोपे यांना नुकताच हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्यातील आरोग्य परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी राज्याचे आरोग्यमंत्री म्हणून डॉ. टोपे यांनी अहोरात्र परिश्रम घेतले. राज्यातील आरोग्य यंत्रणा सुसज्ज करण्याबरोबरच सामान्य जनतेला त्यांनी दिलासा दिला. आरोग्य मंत्री म्हणुन डॉ. राजेश टोपे यांनी दिलेल्या योगदानाची दखल घेऊन केंद्रीय पत्रकार संघाच्या वतीने त्यांचा कोरोना योद्धा पुरस्काराने राष्ट्रीय उपाध्यक्ष तथा महाराष्ट्र प्रभारी कमलेश गायकवाड, राज्य उपाध्यक्ष रेवनाथ नजन, राज्य प्रसिद्धी प्रमुख सिद्धांत कांबळे, खुलताबाद तालुका अध्यक्ष राजेंद्र कसारे, नेवासा तालुका अध्यक्ष प्रवीण तिरोडकर यांनी प्रमाणपत्र देऊन कोरोना योद्धा पुरस्काराने सन्मानित केले.

Leave a Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!