जव्हार येथील पतंगशाह उपजिल्हा रुग्णालय पूर्णवेळ प्रसूतीतज्ञ डॉक्टरांच्या नेमणुकीमुळे तालुक्यात समाधान..

———————————————-
आज दिनांक- २५ सप्टेंबर २०२२ रोजी .
जव्हार सरकारी दवाखान्यात डिलेव्हरी साठी आलेल्या महिलेला प्रसूतीतज्ञ नसल्याने बराच वेळ संघर्ष करावा लागला.
दरम्यान ही बाब श्रमजीवी संघटनेच्या कार्यकर्त्यांना समजतात .
त्यांनी या गंभीर समस्या कडे तात्काळ लक्ष देऊन वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर मराठ सर यांच्याशी संपर्क साधला असता.
डॉक्टर मराड यांनी त्वरित प्रसुती तज्ञ डॉक्टरांची व्यवस्था केली .
या ठिकाणी गेल्या दोन महिन्यापासून प्रसुतीतज्ञ पूर्णवेळ नसल्यामुळे , कितीतरी महिलांना प्रसूतीसाठी संघर्ष करावा लागत होता .
याविषयी येथील वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर मराड सर यांनी प्रसुती तज्ञ व स्त्री रोग तज्ञ डॉक्टरांची मागणी शासन स्तरावर केली होती .
त्या अनुषंगाने शासनाकडून डॉक्टर महाले व डॉक्टर धोंडी या दोन डॉक्टरांची नियुक्ती केलेली आहे .
आता या भागात प्रसूतीसाठी आलेल्या महिलांना होणारा त्रास व संघर्ष संपुष्टात येणार आहे.
दरम्यान डॉक्टरांच्या नियुक्तीमुळे जव्हार तालुक्यातील नागरिकांकडून समाधान व्यक्त केले जात आहे .
तसेच या ठिकाणी विविध प्रकारच्या वैद्यकीय सेवेसाठी तज्ञ डॉक्टर नसल्यामुळे .
येथील रुग्णांना बाहेरगावी जाऊन उपचार घ्यावे लागत आहेत .
परिणामी रुग्णांना असंख्य अडचणींना सामोरे जावे लागते .
यासाठी येणाऱ्या काळात श्रमजीवी संघटनेच्या वतीने आक्रमकपणे आंदोलन करण्यात येणार आहे .
असा इशारा संघटनेच्या महिला उपजिल्हाप्रमुख सीता घाटाळ ,तालुका सचिव संतोष धिंडा , व शहर प्रमुख जमशेद खान ,यांनी दिला आहे .
प्रतिनिधी जहीर शेख सह दर्शन पाडवी जव्हार।…….

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!