कोवीड सेंटरला भेट देऊन आमदारांनी केली सोयी-सुविधांची पाहणी

श्रीरामपूर : आमदार लहू कानडे यांनी नव्यानेच उभारलेल्या 500 रुग्णांसाठीच्या कोवीड सेंटरला सर्व अधिका-यांसमवेत भेट देऊन तेथील सोयीसुविधांची पाहणी केली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या निमीत्ताने अचानक दिलेल्या भेटीदरम्यानही कोवीड सेंटरसमोर बाबासाहेबांच्या प्रतिमेची पुजा करुन तेथील कर्मचारी यांच्यासमवेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्याची संधी मिळाली म्हणून त्यांनी आनंदही व्यक्त केला. सुरुवातीला उभारलेले 100 रुग्णांचे कोवीड सेंटर त्यांनी प्रथम बघितले. तेथील पिण्याच्या पाण्याच्या मोकळ्या बाटल्या व कचरा कर्मचा-यांना सांगून तातडीने स्वच्छ करण्याच्या सुचना दिल्या. तसेच कोवीड सेंटरकडे येणारा रस्ता आजपासूनच दुरुस्त करण्याच्याही बांधकाम विभागास सुचना दिल्या. कोवीड सेंटरमध्ये मिळणा-या जेवणाबद्दल त्यांनी आस्थेवार्इकपणे चौकशी केली. विलगीकरणामध्ये असणारे काही रुग्ण तंबाखू किंवा गुटखा खाऊन नव्यानेच बांधण्यात आलेल्या या सुंदर इमारतीमध्ये थुंकतात व घाण करतात असे आढळून आल्यानंतर त्यांनी तीर्व नापसंती व्यक्त केली. व अशी घाण करणा-या किंवा गुटखा खाणा-या कुणालाही तेथे प्रवेश देऊ नका अशा त्यांनी सुचना दिल्या. शिरसगाव ग्रामपंचायतीने या वसतीगृहामध्ये त्यांच्या पाणीपुरवठा योजनेची कनेक्शन्स दिलेली आहेत. त्याचे काम तातडीने पुर्ण करुन घेण्यात आल्यामुळे आता तेथे टँकरची पाण्याची आवश्यकता राहिली नाही.

कोरोना सेंटरमध्ये सर्व कामे शासकीय अधिकारी व कर्मचारीच करीत आहेत. त्या सर्वांशी संवाद साधतांना आमदार लहू कानडे यांनी कोरोना महामारी हे नैसगिर्क संकट असून आपण सर्वांनी आपल्याला लाभलेल्या पदाचे मोठेपण विसरून समन्वयाने आणि समर्पित भावनेने काम केले पाहिजे. आपण उतत्तम काम करीत आहात आपणांस कोणत्याही प्रकारच्या अडचणी येऊ देणार नाही, काही प्रशन निर्माण झाल्यास माझ्याशी किंवा कार्यालयाशी संपर्क ठेवा मी 24 तास आपल्यासाठी उपलब्ध असेल याची खात्री बाळगा, तथापि कोरोनाने त्रस्त झालेल्या श्रीरामपूर मतदारसंघातील माझ्या मतदारांसाठी आपण सर्वजण मिळून कष्ट करुयात असे आवाहन केले.
ग्रामीण रुग्णालयापाठोपाठ एक मोठे रुग्णालय अधिगृहीत करुन पुन्हा 50-60 ऑक्सीजन बेड उपलब्ध करुन देण्याचा प्रशासन प्रयत्न करत आहे. मी सातत्याने जिल्हाधिका-यांच्या संपर्कात आहे. अवघ्या दोन दिवसातच हा फैसला होर्इल व त्यामुळे ऑस्कीजन बेडसह उत्तम आणि मोफत उपचाराची अधिक सोय होर्इल. त्यामुळे आपला सर्वांचाच ताण थोडासा हलका होर्इल असाही त्यांनी सर्वांना धीर दिला. या प्रसंगी उपविभागीय अधिकारी श्री अनिल पवार, प्रभारी तहसिलदार श्री. गोर्वधने, पोलीस निरीक्षक संजय सानप, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मोहन शिंदे व इतर आरोग्याधिकारी तसेच ज्ञानेश्वर मुरकुटे, सतिष बोर्डे, राजेंद्र औताडे आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!