जिल्हाधिकारी कार्यालय येथे सावली दिव्यांग संघटना करणार आंदोलन..

अधिकाऱ्यांच्या उदासीनतेमुळे दिव्यांग वंचीत : चाँद शेख

जिल्हाधिकारी कार्यालय येथे सावली दिव्यांग संघटना करणार आंदोलन

शेवगाव तालुक्यातील अधिकारी यांच्या उदासीनतेमुळे दिव्यांग बांधव विविध योजनेपासून वंचीत राहत आहेत. सावली दिव्यांग संस्था तसेच सावली दिव्यांग संघटनेकडून वेळोवेळी शेवगाव तालुक्यातील संबंधित अधिकारी यांच्याकडे निवेदन देऊन तसेच आंदोलन उपोषण करून कायदेशीर मार्गाने दिव्यांगांचे प्रश्न अडीअडचणी सोडवण्यासाठी पाठपुरावा केला जात आहे. परंतु संबंधित अधिकारी यांच्या उदासीनतेमुळे शेवगाव तालुक्यातील दिव्यांग बांधव शासनाच्या विविध योजनेपासून वंचीत राहत आहेत असे यावेळी सावली दिव्यांग संघटनेचे अध्यक्ष चाँद शेख यांनी सांगितले. शेवगाव तालुक्यातील अधिकारी यांच्या कारभार विषयी तालुक्यातील दिव्यांग अत्यंत दुःखी असून शिधापत्रिका ऑनलाईन करणे, ऑनलाईन नावे समाविष्ट करणे, ऑनलाईन नावे रद्द करणे,दुबार शिधापत्रिका न देणे, दिव्यांग व्यक्तींसाठी कार्यालयात स्वतंत्र शौचालय नसने, संजय गांधी अनुदान शेवगाव तालुक्यातील संबंधित बँकेच्या आडमुठ्या भूमिकेमुळे लाभार्थ्यांना वेळेत नमिळणे,दिव्यांग व्यक्तींना प्रधानमंत्री आवास योजनेत प्राधान्य नमिळणे,रोजगार हमी योजना अंतर्गत दिव्यांग व्यक्तींना काम नमिळणे त्याच बरोबर बेरोजगार भत्ता देखील नमिळणे,शेवगाव तालुक्यातील सर्व ग्रामपंचायत यांचे दिव्यांग पाच टक्के निधी वाटपात उदासीनता अशा विविध प्रकारच्या मागण्यासाठी सावली दिव्यांग संस्था आणि संघटना यांचेकडून वेळोवेळी पाठपुरावा केला आहे. परंतु संबंधित अधिकारी दिव्यांग बांधवांचे कामे करत नाही त्यामुळे सावली दिव्यांग संस्थेचे संस्थापक अध्यक्ष बाबासाहेब महापुरे यांच्या नेतृत्वाखाली तसेच सावली दिव्यांग संघटनेचे अध्यक्ष चाँद शेख,उपाध्यक्ष संभाजी गुठे,सचिव नवनाथ औटी,
कार्याध्यक्ष मनोहर मराठे,संघटक खलील शेख,सह संघटक अनिल विघ्ने,शिवाजी आहेर,भरत साळुंके,
दत्तात्रय घोरतळे,मनोज गोर्डे,महबुब सय्यद,बंडू गमे, शिवप्रसाद काळे,विजय आंधळे,किशोर मडके,
ताराचंद पिवळ,शहर अध्यक्ष गणेश महाजन उपाध्यक्ष सुनील वाळके,
गणेश तमानके,गणेश तिकोने,नगर शहर अध्यक्ष बाहुबली वायकर,महिला जिल्हाध्यक्षा निर्मला भालेकर,महिला तालुका अध्यक्षा सोनाली चेडे, उपाध्यक्षा निलोफर शेख,भीमा बडे,सुवर्णा देशमुख,सकू मिसाळ,
मालन मिसाळ,वंदना तुजारे,फरीदा शेख,महिला शहर अध्यक्षा चंद्रकला चव्हाण,उपाध्यक्षा संजीवनी अदमाने,
मीरा वाळके,मीरा औटी पदाधिकारी यांच्या उपस्थितीत ०५ डिसेंबर २०२२ रोजी जागतिक दिव्यांग दिन सप्ताहनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालय अहमदनगर येथे बहुसंख्य दिव्यांग बांधवांच्या उपस्थितीत आंदोलन करण्यात येणार असल्याचे सचिव नवनाथ औटी यांनी सांगितले आहे.

अधिकाऱ्यांच्या उदासीनतेमुळे शेवगाव तालुक्यातील दिव्यांग शासनाच्या विविध योजनेपासून वंचीत राहत आहेत त्यामुळे ०५ डिसेंबर २०२२ रोजी जिल्हाधिकारी कार्यालय अहमदनगर येथे आंदोलन करण्यात येईल.प्रत्येक वेळेप्रमाणे फक्त लेखी आश्वासन नको अंमलबजावणी हवी. दिव्यांगांच्या न्याय व हक्कांसाठी शेवगाव तालुक्यातील दिव्यांग बांधवांनी आंदोलनात बहुसंख्येने उपस्थित राहावे.
चाँद कादर शेख
अध्यक्ष सावली दिव्यांग संघटना शेवगाव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!