जव्हार अर्बन बँकेत सर्व पक्षीय विरुद्ध जिजाऊ संघटना रिंगणात 

जव्हार अर्बन – बँक पंचवार्षिक निवडणूक २०२२ या निवडणुकीचा आज नामनिर्देशन फॉर्म मागे घेण्याचा शेवटचा दिवस .
आजच्या दिवशी पात्र ९५ उमेदवारांपैकी एकूण ६१ उमेदवारांनी माघार घेतली आहे .माघार घेतल्यानंतर आता निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले आहे .
आता निवडणुकीच्या मैदानात ३४ उमेदवार असून यात सर्वसाधारण वर्गात २४ , तर इतर मागास वर्गात २ तसेच महिला उमेदवार ४ अनुसूचित जाती जमाती मध्ये २ व विमुक्त जातीचे २ अशा प्रकारे १७ जागेसाठी ३४ उमेदवारांमध्ये थेट समोरासमोर लढत होणार आहे .
या निवडणुकीचे चित्र म्हणजेच निवडणुकीमध्ये खरी लढत सर्वपक्षीय विरुद्ध जिजाऊ संघटना यांच्यात होणार आहे .
दरम्यान आजच्या शेवटच्या दिवशी जहीर शेख , जमशेद खान , चित्रांगण घोलप , त्याचबरोबर इतर ६१ उमेदवारांनी माघार घेतली आहे .
तसेच निवडणुकीत अर्बन बँकेचे संचालक सचिन सटानेकर व जिल्हा परिषद पालघरचे उपाध्यक्ष शिवा सांबरे यांच्यात थेट लढत होणार आहे ,
तसेच अर्बन बँकेचे माजी चेअरमन संतोष चोथे व गणेश रजपूत यांच्यात थेट लढत होणार आहे .
त्याचबरोबर प्रसन्न भोईर व प्रवीण मुकणे यांच्यात काटेकी टक्कर होणार आहे ,
तसेच भारतीय जनता पार्टी , राष्ट्रवादी , शिवसेना शिंदे गट , शिवसेना उद्धव गट , असे चार पक्ष एकत्र येऊन पॅनल तयार केला असून यांची थेट लढत जिजाऊ संघटनेशी असेल असे चित्र समोर दिसून येत आहे .
आता येणाऱ्या १४ तारखेला कोणता उमेदवार बाजी मारतो याकडे सर्व जिल्ह्यातील नागरिकांचे लक्ष लागलेले आहे ।…..
कोकण विभाग प्रमुख जहीर शेख सह दर्शन पाडवी जव्हार ।……

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!