
कुरकुंभ एमआयडीसीत जिल्ह्यातील स्वयंघोषित ठेकेदारांचा सुळसुळाट..!
दौंड प्रतिनिधी:- आलिम सय्यद,
दौंड तालुक्यातुन जाणाऱ्या पुणे-सोलापूर या राष्ट्रीय महामार्गालगत वसलेल्या कुरकुंभ गावात १९९३ मध्ये एमआयडीसी निर्मितीचा पाया रोवला गेला..जागीतिकरणाचे वारे देशाच्या उंबरठ्यावर आले असताना या वसाहतीची निर्मिती झाली..त्यानंतर तालुक्यातील अर्थकारणाचे वारे वाहू लागले..कुरकुंभ परिसराचा काया पालट झाला, काळ सरला आणि आता मात्र कुरकुंभ एमआयडीसी पुन्हा एकदा चर्चेत आली ती म्हणजे एमआयडीसीमध्ये स्वयंघोषित प्रसार माध्यमांच्या स्वयंघोषित ठेकेदारांच्या सुळसुळाटने..कुरकुंभ औद्योगिक क्षेत्र केमिकल झोन आहे,या ठिकाणी अनेक लहान-मोठ्या केमिकल कंपन्यांचे झाळे पसरले आहे,येथील उत्पादनाची आर्यात निर्यात देशासह विदेशात होत असते,मात्र अलीकडच्या काळात कुरकुंभ एमआयडीसीमध्ये आगीच्या स्फोटाच्या घटना तसेच दिवसेंदिवस प्रदूषणात होणारी वाढ यामुळे ही एमआयडीसी नेहमी चर्चेत असते मात्र अलीकडच्या काळात जसजसा डिझिटल क्षेत्रात बदल होत गेला त्याप्रमाणे सोशल मीडियावर एमआयडीसी पुन्हा चर्चेत आली..आणि हळू-हळू पुणे जिल्ह्यासह दौंड तालुक्यातील अनेक गावातील स्वयंघोषित ठेकेदारांची पावले या एमआयडीसीकडे वळू लागली आहेत.कुरकुंभ एमआयडीसी मधील एका कंपनीच्या अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले की..काही बाहेरील स्वयंघोषित ठेकेदार हे कंपनीला काम मागण्याचा तगादा लावत असून काम दिले नाही तर कंपनीच्या विरोधात आम्ही सोशल मीडियावर आवाज उठवू वरिष्ठ अधिकाऱ्यांना कंपनीच्या विरोधात तक्रारी करू अशा प्रकारे हे महाशय कामासाठी तगादा लावत आहेत.अशा या महाशयांना अधिकारी वैतागले असल्याचे चित्र सध्या कुरकुंभ औद्योगिक वसाहतीमध्ये आहे.