अर्बन बँक निवडणुकीच्या प्रचार सभेत निलेश सांबरे विरोधकावर बरसले..

———///——–////———/////—–
जव्हार अर्बन बँक पंचवार्षिक निवडणूक . बँकेत होणाऱ्या भ्रष्टाचाराच्या विरोधात निलेश सांबरे यांची डरकाळी फुटली .
जनसेवा पॅनल तर्फे आज दि. ९-११-२०२२ रोजी जव्हार शहरांमध्ये मोठ्या संख्येने प्रचार रॅली काढण्यात आली .
या प्रचार रॅलीत हजारोच्या संख्येने कार्यकर्ते व नेते उपस्थित होते .
तसेच जिजाऊ संस्थेचे संस्थापक अध्यक्ष निलेश सांबरे यांची गांधी चौक येथे मोठया जनसंख्येच्या उपस्थितीत प्रचार सभा पार पडली .
या प्रचार सभेत बोलत असताना संघटनेचे अध्यक्ष निलेश सांबरे यांनी जनसेवा पॅनलचे सर्व उमेदवारांना निवडून द्या अशी मागणी करत .
जव्हार बँकेत जनसेवा पॅनलचा एक ही संचालक पाच वर्षे बँकेचा भत्ता घेणार नाही .
अशी सर्व संचालकाच्या वतीने निलेश सांबरे यांनी ग्वाही दिली .
तसेच येणाऱ्या काळात बँकेला “अ” वर्गात नेण्यासाठी स्वतःचे १५ कोटी रुपयाची ठेवी बँकेत ठेवणार आहे असे आश्वासन ही दिले .
विरोधकांवर टीका करत निलेश सांबरे यांनी सांगितले बँकेचा पैसा गोरगरीब खातेदाराचा पैसा आहे .
आणि या पैस्यातून बँकेचे माजी संचालक गुवाहाटी , कश्मीर ,अशा विविध ठिकाणी जाऊन दारू पिऊन मौज मजा करत असतात .
अशा लोकांना मतदार मदत करणार का?व निवडून देणार का?
असे वक्तव्य करत निलेश सांबरे विरोधकांवर बरसले .
तसेच अशोक चौधरी यांनी देखील विरोधकावर टीका करत . एक छोटीशी संस्था व बँक असली तरी देखील त्यांच्याही नफा ४० लाख असतो .
परंतु अर्बन बँकेची शाखा कुडूस ,विक्रमगड , मनोर मोखाडा बोईसर ,खोडाळा ,जव्हार ,अशा ७ ठिकाणी असून देखील .
अर्बन बँकेचा नफा ४३ लाख रुपये इतकं आहे ही अतिशय खेदाची बाब आहे .
अशा प्रकारे या संचालक मंडळांनी अर्बन बँकेला “ब” वर्गात घेऊन गेले . तरीदेखील आपण यांना मत देणार का? अशी टीका अशोक चौधरी यांनी केली .
दरम्यान निवडणूक रंगतदार होणार आहे .
बघूया येणाऱ्या काळात अर्बन बँकेवर कोण झेंडा फडकवतो ।……
कोकण विभाग प्रमुख जहिर शेख यांची रिपोर्ट जव्हार ।………

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!