हिंदी – मराठी पत्रकार संघाच्या मलकापुर शहर अध्यक्ष पदी शेख जमिल भाई यांची नियुक्ती..

प्रतिनिधी

पत्रकारिता क्षेत्रामध्ये आपली आगळीवेगळी ओळख निर्माण करणारे व आपल्या  निर्भीड व रोखठोक बातम्यांसाठी प्रसिद्ध असलेले साप्ताहिक शब्द की गुंज मुख्य संपादक शेख जमिलभाई जान मोहम्मद यांची हिंदी मराठी पत्रकार संघाच्या  मलकापुर शहर अध्यक्ष पदी  नियुक्ती करण्यात आली. सदर निवड तळागळातील शोषित,पिडित,वंचितांना न्याय मिळवून द्यावा हीच आशा बाळगत निवड करण्यात आली आहे . सदर निवड महाराष्ट्र राज्य अध्यक्ष हिंदी मराठी पत्रकार संघटना धनश्रीताई काटीकर पाटील यांनी नियुक्तीपत्र देऊन केली.

राष्ट्रीय पत्रकार दिनाचे औचित्य साधून हिंदी मराठी पत्रकार संघाच्या कार्यालयात आयोजित कार्यक्रमांमध्ये जिल्हा  व विभाग अधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये हिंदी मराठी पत्रकार संघाच्या मलकापूर शहर कमिटीचे पुनर्गठन करण्यात आले असून जुन्या नियुक्त रद्द करून त्या ऐवजी नवीन शहर कार्यकारणी तयार करण्यात आली असून याचाच एक भाग म्हणून साप्ताहिक शब्द की गुंज चे मुख्य संपादक जमील भाई जान मोहम्मद यांची नियुक्ती करण्यात आली. त्यावेळी ,  उल्हास शेगोकार तालुकाध्यक्ष,  अजय टप विदर्भ प्रसिद्धी प्रमुख,सतीश दांडगे विदर्भ सचिव, श्रीकृष्ण तायडे विदर्भ समन्वयक,  गौरव खरे जिल्हाध्यक्ष , स्वप्निल आकोटकर जिल्हा सचिव , श्रीकृष्ण भगत तालुका सचिव ,  विनायक तळेकर शहर सहसचिव, योगेश कुमार सोनवणे शहर सह संघटक ,सय्य्द ताहेर , प्रा प्रकाश थाटे, प्रमोद हिवराळे ,ईश्वर दिक्षित  हिंदी मराठी पत्रकार संघ यांच्या उपस्थितीमध्ये नियुक्तीपत्र देऊन  निवड करण्यात आली आहे.

सदर निवडीबद्दल  मलकापुर शहर अध्यक्ष पदी शेख जमिल भाई यांच्यावर सर्व स्तरावरून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. हिंदी मराठी पत्रकार शहर कार्यकारणीला पुढे नेत हिंदी मराठी पत्रकार संघाचे काम संपूर्ण जिल्हाभर पोहोचवण्याचे काम पूर्ण ताकदीने करणार असल्याची ग्वाही यावेळी हिंदी मराठी पत्रकार संघाचे नियुक्त शहर अध्यक्ष शेख जमील भाई यांनी दिली

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!