माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे व भारतीय जनता पार्टी नेवासा तालुका अध्यक्ष भाऊसाहेब फुलारी यांनी नगरचे जिल्हाधिकारी यांना निवेदन

मा.उच्च न्यायालयाच्या शासकीय व गायरान जमिनीवरील अतिक्रमण काढण्याच्या निर्णयाबाबत माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे व भारतीय जनता पार्टी नेवासा तालुका अध्यक्ष भाऊसाहेब फुलारी यांनी नगरचे जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले.

मा.उच्च न्यायालयाच्या गायरान जमिनीवरील अतिक्रमण काढण्याच्या आदेशामुळे स्वाभाविकच अनेक पिढ्यानपिढ्यांपासून गायरान क्षेत्रांमध्ये बांधलेली जी घरे आहेत, ती नियमित कशी करता येईल याबाबत राज्य सरकार कार्यवाही करत आहे.
सदर अतिक्रमणे सरकार काढणार नाही. त्याचबरोबर सदर अतिक्रमणे नियमित करताना न्यायालयाच्या निर्णयाचा आदर राखावा लागेल. न्यायालयाच्या निर्णयाला अधीन राहून सर्वसामान्य जनतेला न्याय द्यावा लागेल. सामान्य माणसाला विस्थापित करण्याची सरकारची भूमिका नाही. सरकार जनतेच्या पाठीमागे खंबीरपणे उभे आहे.
न्यायालयाच्या निर्णयाने काही लोक विनाकारण राजकारण करत आहे. त्यांना सरकार गेल्याचे दुःख आहे. काही लोकांची अडचण झाली आहे. यामुळे वैफल्या पोटी काही लोक सरकारवर आरोप करत आहेत. गायरान क्षेत्रातील अतिक्रमणा बाबत झालेल्या निर्णयाची सामान्य माणसाला झळ पोहचणार नाही याबाबत सरकार गंभीर आहे.
गेल्या ३०-४० वर्षापासून या शासकीय गायरान जमिनीवरती अनेक गोरगरिबांनी घरे बांधून राहत आहेत या जमिनीवरती सरकारने घरकुले त्याचप्रमाणे शासकीय अनुदानित शौचालय बांधलेले आहे. तसेच दलित वस्ती अंतर्गत अनेक विकासाची कामे या ठिकाणी झालेली आहेत असे असताना ग्रामपंचायतीने या जागेवरती बांधकाम झालेल्या घराची घरपट्टी अनेक वर्षापासून वसूल करत आहे. तसेच ग्रामपंचायत मध्ये भोगवटादार म्हणून या घरकुलाचा उताराही निघत असताना उच्च न्यायालयाने दिलेला हा निकाल यावरती राज्य सरकार राज्य सरकारने अनेक वेळा घरकुले नियमित करण्याबाबत पत्रके काढलेली आहेत.
माननीय जिल्हाधिकारी यांनी या शासकीय गायरान जमिनीची अतिक्रमणे काढण्याचे काम थांबावावे यासाठी हे निवेदन देण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!