
सह्याद्री इंडस्ट्रीज पुणे व रोटरी क्लब पुणे फार ईस्ट, रोटरी इंटरनॅशनल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने दौंड येथे मॅमोग्राफी मशीन देण्यात आली.
दौंड:-आलिम सय्यद
सह्याद्री इंडस्ट्रीज पुणे व रोटरी क्लब पुणे फार ईस्ट, रोटरी इंटरनॅशनल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने दौंड या ठिकाणी महालक्ष्मी मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल येथे मोफत डायलिसिस मशीन व मॅमोग्राफी मशीन देण्यात आली. दौंड शहर परिसर व आजूबाजूच्या सर्व तालुक्यांमध्ये मॅमोग्राफी या मशीनची निकड लक्षात घेता वरील सर्व आयोजकांनी मशीनचे सहकार्य केले .स्तनाचा कॅन्सर याचे लवकरात लवकर निदान व्हावे व त्या माध्यमातून सर्व महिलांना याचा लाभ मिळावा व त्याचबरोबर दौंड शहर आणि परिसरामध्ये वाढलेले डायलेसिस ची पेशंट यांचा विचार करता डायलिसिस मशीनही देण्यात आली .याप्रसंगी सह्याद्री इंडस्ट्रीचे पदाधिकारी उपस्थित होते त्याचबरोबर पुणे फॉरेस्ट क्लबचे अध्यक्ष ,त्याचबरोबर मेंबरशिप डायरेक्टर व रोटरी थ्री वन थ्री वन चे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर रोटरीन अनिल परमार उपस्थित होते. याप्रसंगी दौंड शहर आणि परिसरातील सर्व डॉक्टर्स , समाजसेवी संस्था पत्रकार उपस्थित होते. या कार्यक्रमामुळे निश्चितच गोरगरीब जनतेची सेवा रोटरीच्या माध्यमातून होईल असा विश्वास सर्वांनी व्यक्त केला .याप्रसंगी दौंड रोटरी क्लबचे अध्यक्ष डॉक्टर राजेश दाते ,सचिव रोटर आमिर शेख ,महालक्ष्मी हॉस्पिटलच्या संचालिका डॉक्टर शलाका लोणकर ,डॉक्टर दत्तात्रय लोणकर , रोटरी क्लब चे सर्व सन्माननीय सदस्य उपस्थित होते
*दौंड शहरात आणि परिसरातील महिलांना आता मॅमोग्राफी मशीन मुळे स्तनाचा होणारा कॅन्सर याचे निदान या मशीनमुळे आता लवकरात लवकर होण्यास मदत होणार आहे त्यामुळे निश्चितच कॅन्सरचा वाढता प्रभाव आटोक्यात येण्यासाठी ही मशीन निश्चितच खूप महत्त्वाचे ठरेल असे रोटरीचे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर रोटेरियन डॉक्टर अनिल परमार यांनी म्हटले आहे*