दारूच्या नशेत बस चालक ,” ११ वर्षीय चिमुकल्याच्या जागेवरच मृत्यू ..

महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळ एसटी बस सेवा .
परिवहन मंडळाची सेवा नागरिकांसाठी सुख-समृद्धी तसेच कमी दरात असलेली सेवा आहे. महाराष्ट्र परिवहन सेवा असल्याने वृद्धांना तसेच शाळेतील विद्यार्थ्यांना तसेच अनेक प्रवाशांना सवलत मिळत असते .
परंतु याच्या पलीकडे बघितलं तर महाराष्ट्र परिवहन मंडळामध्ये काम करणारे काही ड्रायव्हर धूम्रपान व दारूच्या नशेत प्रवासांचा विचार न करता बेधडकपणे बस चालवताना आढळतात .
रस्त्यावर कोणीही असो उदाहरण अर्थ पोलीस अधिकारी , पोलीस कर्मचारी , तसेच दवाखान्याची रुग्णवाहिका , कुठलाही विचार न करता कोणालाही हे ड्रायव्हर न जोमानता रस्त्यावर दादागिरी करत असतात .
या ठिकाणी प्रश्न निर्माण होत आहे बस ड्रायव्हर यांना परिवहन मंडळाकडून अशीच शिक्षा दिली जाते का ?
यांच्यावर परिवहन मंडळाचे अधिकाऱ्यांचे काही बंधन आहेत का
वारंवार होणारे बस अपघातावर नियंत्रणासाठी काही उपाय योजना होणार आहे की नाही .?
हा एक मोठा प्रश्न या ठिकाणी निर्माण होत आहे ?
दरम्यान १० नोव्हेंबर २०२२ रोजी रात्री ८.३० च्या सुमारास जव्हार एसटी स्टँड येथे बसने भिंतीला दिलेल्या धडकेने झालेल्या अपघातामध्ये चिमुकल्याचा मृत्यू झाला .
डहाणू ते जव्हार येणारी बस जव्हार एसटी स्टँड येथे ड्रायव्हर दारूच्या नशेत बस चालवत असताना मागेपुढे न बघता कुठलीही सुरक्षा न बाळगता त्या ड्रायव्हरने भिंतीला धडक दिल्याने भिंतीच्या मागे बसलेल्या ११ वर्षीय बाळाचा जागेवरच बळी गेला . घटनास्थळी आजू बाजूला असलेले नागरिकांनी धाव घेतली चिमुकल्याला वाचवण्याचा प्रयत्न केला .
परंतु बाळाचा जागेवरच मृत्यू झाला होता.
खेदाची बाब म्हणजे बस चालक दारूच्या नशेत असल्यामुळे जागेवरून फरार झाला .
त्याचप्रमाणे त्या बसला एसटी स्टँड येथे प्रवासी धक्का मारून बस चालू करत होते .
या बसेसला फिटनेस प्रमाणपत्र आहे का .
तसेच एस. टी .महामंडळाच्या बसला वेळेवर सर्विसिंग होते का . त्याचप्रमाणे वारंवार होणाऱ्या अपघातावर अधिकाऱ्यांच्या लक्ष आहे का
तसेच परिवहन मंडळाच्या अधिकाऱ्यांना प्रवाशांची परवा देखील नाही असे या ठिकाणी दिसून येत आहे .
त्याचबरोबर काही बस चालकांना परत प्रशिक्षणाची गरज आहे .
असे या अपघातात तसेच वारंवार होणाऱ्या व जास्त प्रमाणात बस अपघाता दरम्यान दिसून येत आहे .
म्हणून महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळ अधिकारी धूम्रपान व दारूच्या नशेत तसेच अशिक्षित ड्रायव्हर या सर्व बाबीकडे तसेच होणाऱ्या वारंवार अपघाताकडे लक्ष देऊन उपाययोजना करणार का .
याकडे सर्व जिल्ह्यातील नागरिकांचे लक्ष लागलेले आहेत ।…….
कोकण विभाग प्रमुख जहीर शेख यांची रिपोर्ट।…….

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!