
कोरोना बाधीत पत्रकारांना मोफत उपचार व आर्थिक मदतीचा विचार व्हावा : रोहिणी ताई खडसे
*कोरोना बाधीत पत्रकारांना मोफत उपचार व आर्थिक मदतीचा विचार व्हावा : रोहिणी ताई खडसे* ; *शासनाकडे पाठपुरावा करणार*
—————————————-
*राजु तडवी फैजपुर*
जीवाची पर्वा न करता कोरोना काळात वृत्तसंकलन करण्यासाठी घराबाहेर पडून वृत्तसंकलन करणाऱ्या पत्रकार बांधवांना कोरोनाची लागण झाल्यास मोफत औषध उपचार मिळावेत आणि कोरोनामुळे मृत्यू झाल्यास ५० लाख रुपयांची आर्थिक मदत देण्यात यावी या पत्रकार यांच्या मागणीचा शासनाने जरूर विचार करावा असे जिल्हा बँकेच्या अध्यक्षा अड.रोहिणी ताई खडसे खेवलकर यांनी सांगितले. ताप्ती सातपुडा जर्नलीस्ट असोसिएशन सावदा व इंडियन जर्नलीस्ट असोसिएशन फैजपूर यांच्या वतीने नुकतेच प्रांताधिकारी फैजपूर यांना निवेदन देण्यात आले आहे.त्याबाबत बोलताना सौ.रोहिणी ताई खडसे म्हणाल्या पत्रकार हे आपला जीव धोक्यात घालून बाहेर फिरून वृत संकलन करतात.व सर्व घडा मोडी वाचकापर्यंत पोहचवितात.सर्वच बातम्या काही टेबल न्युज नसतात.तर विविध घटना,कोरोना लॉक डाऊन संदर्भ तील बातम्या साठी त्यांना बाहेर जावेच लागते.त्यामुळे त्यांना कोरोना ची लागण होण्याची दाट शक्यता असते.लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेला पत्रकार हाही कोरोना योद्धा आहेेत.राज्यात अनेक ठिकाणी पत्रकार कोरोना बाधित होऊन मृत्यू पावले आहेत.पत्रकार हे मान सेवी असल्याने त्यांची आर्थिक परिस्थिती तशी फारशी चांगली नसते.त्यासाठी त्यांच्या कुटुंबाला आधार मिळावा यासाठी पत्रकार संघटनांनी केलेली मागणी योग्य व रास्त आहे.तिचा शासनाने जरूर विचार करावा.असे मला वाटते.याबाबत आपणही पाठ पुरावा करणार आहोत.असे रोहिणी ताई खडसे यांनी सांगितले.