
महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सोमवार, दि.19 डिसेंबरपासून नागपूर येथे सुरु..
महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सोमवार, दि. 19 डिसेंबरपासून नागपूर येथे सुरु होणार आहे. दिनांक 19 ते 30 डिसेंबर या कालावधीत अधिवेशनाचे कामकाज घेण्याचा निर्णय आज विधानसभा आणि विधानपरिषद कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत घेण्यात आला.
विधानपरिषद कामकाज सल्लागार समितीची बैठक उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या अध्यक्षतेखाली तर विधानसभा कामकाज सल्लागार समितीची बैठक अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांच्या अध्यक्षतेखाली आज घेण्यात आली. या बैठकांना विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार, संसदीय कार्य मंत्री चंद्रकांत पाटील, बंदरे विकास मंत्री दादाजी भुसे, विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आदी मान्यवर उपस्थित होते.
दिनांक 19 ते 30 डिसेंबर दरम्यान होणाऱ्या विधानपरिषद व विधानसभा बैठकांच्या तात्पुरत्या दिनदर्शिकेवर या बैठकीत चर्चा करण्यात आली. या अधिवेशनात सीमा प्रश्नावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठराव मांडणार आहेत. तसेच मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्ताने विशेष कार्यक्रम राबविण्याबाबत यावेळी चर्चा झाली. विधिमंडळाच्या कामकाज सल्लागार समितीची बैठक दि 28 डिसेंबर रोजी घेण्याचे यावेळी निश्चित करण्यात आले. या अधिवेशनात अंदाजे 21 विधेयके सभागृहात चर्चा आणि मंजुरीसाठी मांडली जाणार आहेत.
आणखीन काही महत्त्वाचे
शेवगाव शहरातील टपरी धारकांचे तत्काळ पुनर्वसन करा कॉ. संजय नांगरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या उपोषणाचा दुसरा दिवस
शेवगाव प्रतिनिधी सविस्तर वृत्त असे की शहरातील प्रमुख राज्य महामार्गावरील अतिक्रमण हटाव मोहिमेत विस्थपित झालेल्या व्यापाऱ्यांचे प्रशासनाने तातडीने पुनर्वसन करावे...
चाइल्ड करीअर इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज चा नवरंग कला महोत्सव 2025
चाईल्ड करिअर इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजचे वार्षिक स्नेहसंमेलन ठरले लक्षवेधी. नेवासा तालुक्यातील सलाबतपुर येथील गुणवत्ता संस्कार संस्कृती व...
शेवगांव तालुक्यात राजरोस अफुची शेती अफुच्या झाडाची बेकायदेशिर रित्या लागवड..
शेवगांव तालुक्यात राजरोस अफुची शेती अफुच्या झाडाची बेकायदेशिर रित्या लागवड करणा-या आरोपीस साडेअकरा लाख किंमतीच्या मुद्देमालासह गणेश नवनाथ घोरतळे या...
मढी ग्रामपंचायत सदस्यांची सदस्यता रद्द करण्याची एमआयएमची मागणी
लोकप्रतिनिधी कायदया अंतर्गत सदस्यता रद्द करा - डॉ परवेज अशरफी नगर - सध्या महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशात तसेच ज्या...
तालुकाध्यक्षपदी अशोकराव मोरे यांची निवड..
नेवासे शहर ता.04 अंमळनेर येथील सामजिक कार्यकर्ते अशोकराव मोरे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित दादा गटाच्या) नेवासे तालुकाअध्यक्षपदी निवड करण्यात...
चाइल्ड करिअर इंग्लिश मिडीयम स्कूल अँड ज्युनियर कॉलेज मध्ये गुरुौर्णिमा उत्साहात साजरी..
चाइल्ड करिअर इंग्लिश मिडीयम स्कूल अँड ज्युनियर कॉलेज मध्ये गुरुौर्णिमा उत्साहात साजरी नेवसा तालुक्यातील सलाबतपुर येथील चाईल्ड करिअर इंग्लिश मिडीयम...