
पांढरेवाडी कुरकुंभ रस्त्याची दुरवस्था,..रस्त्याला पडलेत दोन दोन फूट खड्डे..
दौंड प्रतिनिधी:- आलिम सय्यद,
दौंड तालुक्यातील पांढरेवाडी ग्रामपंचायत हद्दीतील मुख्य रस्त्यावर जागोजागी खड्डे पडून रस्त्याची चाळण झाली आहे. हे खड्डे दोन दोन फूट इतके मोठे असल्याने खड्डे चुकविताना छोटे मोठे अपघात घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच या ठिकाणी अनेक चारचाकी वाहने पलटी झाल्याची घटना घडल्या आहेत.
दौंड तालुक्यातील पांढरेवाडी ग्रामपंचायत हद्दीत औध्यगिक वसाहत असल्याने पांढरेवाडी ग्रामपंचायत दौंड तालुक्यात श्रीमंत ग्रामपंचायत म्हणून ओळखली जाते. परंतु या गावातील मुख्य रस्त्याचीच मोठ्या प्रमाणात वाट लागल्याचे चित्र आहे. कुरकुंभ पांढरेवाडी ते हिंगणी गाडा येथील बारामती पाटस पालखी महामार्गाला जोडणारा हा रस्ता आहे. त्यामुळे हिंगणी गाडा, वासुंदे ,रोटी , तसेच या परिसरातील वाड्या वस्ती येथील नागरिक, विद्यार्थी, कामगार , प्रवासी कुरकुंभ व दौंड ला जाण्यासाठी हा जवळचा मार्ग आहे. दौंड हे तालुक्याचे ठिकाण असल्याने दौंड ला शासकीय,राजकीय, शालेय या कामासाठी तसेच कुरकुंभ एम. आय. डी. सी मध्ये कामासाठी बारामती तालुक्यातील नारोळी, कोरोळी, सोनापीरवाडी तसेच विविध गावातील कामगार या रस्त्याने ये जा करत असतात या रस्त्यावरून जाणाऱ्यांची संख्या मोठी असल्याने हा रस्ता मोठया प्रमाणात उपयुक्त ठरत आहे. तसेच कुरकुंभ वरून पांढरेवाडी ते हिंगणी गाडा बारामती पाटस पालखी महागमार्गाला जोडणारा हा रस्ता आहे. त्यामुळे शेती व्यवसाय व दुग्धव्यवसाय साठी हा रस्ता उपयुक्त ठरत आहे. पण या रस्त्यावर जागो जागी मोठ मोठे खड्डे पडून रस्त्याची चाळण झाली असल्यामुळे याचा त्रास प्रवासी,व्यावसायिकांना व शालेय विद्यार्थ्यांना होत आहे. या खड्डेमय रस्त्याने शालेय लहान विद्यार्थी जीव मुठीत धरून सायकलवरून प्रवास करत असतात.
या रस्त्या वरील साईड पट्टयादेखील मोठ्या प्रमाणात खचल्या आहेत तसेच रस्त्याच्या बाजूला मोठ्या प्रमाणात काटेरी झुडपे देखील आहेत. त्यामुळे दु चाकी व चार चाकी या वाहनांचा छोटे मोठे अपघात होत असून रस्त्यावर वाद विवाद चालू असतात. असे परिसरातील नागरिक सांगत आहेत. व गाड्याचेही नुकसान होत आहे. त्यामुळे याचा तोटा वाहन चालक व शेतकऱ्यांना बसत आहे. त्यामुळे हा रस्ता मोठा व्हावा व रस्त्याच्या बाजूला असणाऱ्या काटेरी झुडपे काढून लवकरात लवकर रस्ता व्हावा अशी मागणी ग्रामस्थ करीत आहे.
*पांढरेवाडी गावात काही दिवसांपूर्वी भैरवनाथ सोसायटीच्या कार्यक्रमाप्रसंगी माजी आमदार रमेश थोरात आले असता या रस्त्याबाबत त्यांनी खंत व्यक्त केली होती*
*सदर कुरकुंभ -पांढरेवाडी रस्त्याचे काम मंजूर असून रस्त्याचे टेंडर प्रोसेस मध्ये आहे.टेंडर ची प्रोसेस पूर्ण झाल्यानंतर लवकरात लवकर वर्क ऑर्डर काढून रस्ता करू व सध्याची रस्त्याची परिस्तिथी पाहता खड्डे पडलेल्या ठिकाणी खड्डयात मुरूम भरू.*
*एच एन माळशिखरे उपअभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग दौंड*