
विकास आराखडा लोकांच्या हिताचा कि एका अविचारी डोक्याचा..
जव्हार नगरपरीषदेच्या अध्यक्ष आणि सदस्यांचा कार्यकाळ दोनचार दिवसात संपुष्टात येत आहे .
त्यामुळे आपल्याला हवे तेच करुन घेण्यासाठी धावपळ वाढलेली दिसते आहे .
आपल्या अधिकारात एखाद्या विषयामध्ये कुणाचे भले करायचे किंवा वाईट भावनेने काटा काढायचा याचा निर्णायक क्षण जवळ आल्याने प्रथम नागरिकाची धडपड सुरु असलेली दिसते आहे . अतितातडीच्या सभा लावून अविचारी पणे निर्णय घेण्यासाठी सदस्यांना वेठीस धरले जात आहे .
या अतितातडीच्या सभांमध्ये शहराच्या विकास आराखड्याला मंजुरी देण्यासाठी होत असलेली धडपडही दिसुन येत आहे .
शहराचा विकास आराखडा हा काही रोजच्या रोज घडवून आणला जाण्यासारखा विषय नाही .
पुढील अनेक वर्षांचा विकासाच्या दृष्टीने शहराचे नियोजनाचे धोरण आखुन त्याप्रमाणे निर्णय घेत शहरातील नागरिकांना फायदेशीर ठरेल अशा पध्दतीने आखलेले आराखडे यात अपेक्षित आहेत .
परंतु सत्येचा माज चढलेल्यांना विकास आराखड्याच्या माध्यमातून शहरातील काही नागरिकांना ञास देण्याची सुवर्णसंधी वाटते.
आपले वैयक्तिक राग रुसवे काढण्यासाठी यांना शासनाने संधी निर्माण करुन दिल्याचीच भावना असल्यासारखे याचे वागणे दिसु लागते.
जव्हार शहरामध्येही काट्याने काटा काढण्याची सुवर्ण संधी म्हणून याकडे पाहीले जात आहे .
नगरपरीषद सदस्यांसह शेकडो नागरिकांचा या नियोजित आराखड्याला विरोध असतानाही प्रथम नागरिक काही हितशञूंना ञास देण्याच्या इराद्याने अतितातडीच्या सभा घेऊन ठराव मंजुर करण्यासाठी शक्ती पणाला लावताना दिसत आहे . सदरच्या आराखड्याची प्रसिद्धी स्थानिक पेपरात देऊन नगरपालिकेच्या कार्यालयात प्रसिद्धी करणे जरुरीचे आहे .
परंतु प्रशासनाने कोणत्याही प्रकारची कार्यवाही न केल्याने ग्रामस्थांच्या रोषास सामोरे जावे लागणार आहे .
तसेच प्रारूप आराखडा तयार करताना आर्किटेक्ट याची नेमणूक करून तयार करणे गरजेचे असताना देखील .
प्रत्यक्षात नगराध्यक्ष व गावातील नामांकित यांनी स्वतःच्या हिताचा आराखडा तयार केल्याचे समजते विचारी सदस्य अशा अविचारी डोक्याच्या मागे लागून शहराच्या दृष्टीने घातक निर्णायला पाठिंबा देणार नाहीत अशी खात्री आहे .
परंतु जर चुकिच्या पध्दतीने सादर केलेल्या विकास आराखड्याला मंजुरी घेण्यात ही अविचारी शक्ती यशस्वी झाली तर …
विचार करा आणि वेळीच चुकीचा निर्णय होवू देवू नका
हीच नगरपरीषदेच्या सदस्यांसह नागरीकांना विनंती ..!
कोकण विभाग प्रमुख जहीर शेख ।……