
पांढरेवाडी येथे क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले जयंती मोठ्या उत्साहात साजरी..
दौंड:- आलिम सय्यद,
दौंड तालुक्यातील पांढरेवाडी येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांची १९२ वी जयंती निमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाप्रसंगी सरपंच छाया झगडे, पोलीस पाटील विलास येचकर, बाळकृष्ण भागवत, यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन व दिप प्रज्योलीत केले तसेच पत्रकार आलिम सय्यद यांच्या हस्ते श्रीफळ वाहून करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. व नंतर मान्यवरांचा सन्मान करण्यात आला व शालेय मुलांची सावित्रीबाई यांच्या विषयी भाषणे झाली तसेच शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या शिक्षीकांचा सावित्रीबाई फुले यांच्या नावाने”आदर्श शिक्षिका” म्हणुन संगीता जमदाडे व आदर्श अंगणवाडी शिक्षिका म्हणून अलका राखमाजी गायकवाड, यांना पुरस्कार दिला तसेच मुलीना शिक्षण,क्रिडा,कला,विषयात प्रोत्साहीत करणा-या माताना “आदर्श माता” म्हणून लताबाई सुखदेव जाधव यांना पुरस्कार देण्यात आला. यावेळी मान्यवरांच्या हस्ते हे पुरस्कार देण्यात आले. या कार्यक्रमा प्रसंगी ,पांढरेवाडी गावचे सरपंच छाया झगडे, तंटामुक्त अध्यक्ष बाळकृष्ण भागवत, पोलीस पाटील विलास येचकर, ग्रामपंचायत सदस्या पदमाताई गायकवाड, संदिप जगताप, राजेंद्र भागवत, सुनील भागवत, खंडू भागवत, अतुल कोंडे, अँड. राहुल झगडे, आर पी आयचे दौंड तालुका उपाध्यक्ष नवनाथ गायकवाड, शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य सलीम सय्यद , विजय झगडे, स्वप्नील भागवत, तसेच सर्व शिक्षक वर्ग तसेच ग्रामस्थ व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे नियोजन संत सावता महाराज पुण्यतिथी उत्सव समिती व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक पोलीस पाटील विलास येचकर यांनी केले तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंजिरी बिडवे यांनी तर आभार मुख्याध्यापक मच्छिंद्र रामगुडे यांनी केले