दौंड तालुक्यातील कुरकुंभ बारामती रस्त्यावर जिरेगाव हद्दीत एका तरुणाचा खून..

दौंड:-आलिम सय्यद

दौंड तालुक्यातील पारगाव येथील निर्घृण हत्याकांड झाल्याची घटना ताजी असतानाच आज कुरकुंभ- बारामती महामार्गावरील जिरेगाव गावच्या हद्दीत एका युवकाचा खून करून मृतदेह आणून टाकल्याची घटना आज सकाळी समोर आलीय. या घटनेत प्राथमिक माहितीनुसार सदरचा युवक हा बारामती तालुक्यातील असून मोनू बारवकर ( वय अंदाजे 27) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. या खून झालेल्या युवकाच्या डोक्याला जबर मारहाण झाली असून छातीवरही जबर जखमा आहेत. सदर घटनास्थळी दौंड उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस, सह्यायक पोलीस निरीक्षक तुकाराम राठोड, पोलीस उपनिरीक्षक शहाजी गोसावी यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी करून पुढील तपास पोलीस करत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!