आनंदी जीवन फाउंडेशनच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार तर १२० विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप..

दौंड:- आलिम सय्यद,

दौड तालुक्याच्या पश्चिम भागातील जावजीबुवाची वाडी येथील प्राथमिक शाळेतील इयत्ता १ ली ते इयत्ता ७ वी मधील २१ गुणवंत विदयार्थ्यांना आनंदी जीवन फाउंडेशनच्या वतीने सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. तसेच येथील जिल्हा परिषद शाळेतील इतर विध्यार्थ्यांना शिक्षणामध्ये प्रोत्साहन मिळावे म्हणून शालेय साहित्य तसेच खाऊचे यावेळी वाटप करण्यात आले.
यावेळी विद्यार्थ्यांशी हितगुज करताना आनंदी जीवन फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ.मोहसीन पठाण यांनी सांगितले की मी स्वतः एक डॉक्टर आहे परंतु विदयार्थी ते डॉक्टर हा माझा प्रवास खूप खडतर असून मी अनेक संकटांचा सामन करत इथपर्यंत पोहचलो आहे. मला माझे शिक्षण पूर्ण करणेसाठी खूप लोकांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे. परिस्थितीमुळे कोणाचे ही शिक्षण अर्धवट राहू नये,सर्वांना उच्चशिक्षण मिळावे,सामाजिक बांधिलकी टिकून राहावी म्हणून आम्ही काही मित्रांनी एकत्रित येत आनंदी जीवन फाउंडेशन या नावाने संस्था चालू केली असून आमच्या फाउंडेशनच्या माध्यमातून आम्ही लवकरच ग्रामीण भागातील विध्यार्थ्यांना शिक्षणाची आवड निर्माण होण्यासाठी व आपली स्वप्न पूर्ण करणेसाठी त्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी स्पर्धा परीक्षा केंद्राची निर्मिती करणार आहोत तसेच जेष्ठ नागरिकांसाठी वृद्धाश्रम चालू करणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!