अशोक कुटेंच्या वाढदिवसानिमित्त विविध जिल्ह्यात सर्व जातीय मोफत वधू-वर मेळाव्याचे आयोजन..

अहमदनगर प्रतिनिधी..

दि.13 एप्रिल । जगदंब फाउंडेशनचे सचिव व मराठी सोयरीक संस्थेचे अध्यक्ष अशोक पांडुरंग कुटे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध जिल्ह्यांमध्ये सर्व जातीय मोफत वधू वर मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेले आहे. तसेच मनोविकलांग साठी काम करणाऱ्या मानव सेवा प्रकल्प अरणगाव , वडाळा येथील आधार सेवा वृद्धाश्रम येथे वाढदिवस साजरा केला जाणार आहे अशी माहिती जगदंब फाउंडेशनचे अध्यक्ष गणेश लंघे यांनी दिली आहे.

 

सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे अशोक कुटे हे वाढदिवसानिमित्त नेहमी सामाजिक उपक्रम राबवत असतात. यावर्षी अरणगाव येथील मनोविकलांग आश्रम मानव सेवा प्रकल्प, वडाळा येथील आधार सेवा वृद्धाश्रम येथे वाढदिवस साजरा करणार आहेत. त्यामुळे सर्व मित्रपरिवार यांनी आपल्या सोबत आश्रमात वंचित घटकांना आधार द्यावा. त्यांच्या सुखदुःखात सहभागी व्हावे, त्यामुळे आश्रमाच्या संचालकांना देखील आत्मविश्वास मिळतो, मनोधैर्य वाढते.

तसेच जगदंब फाउंडेशन च्या वतीने मराठी सोयरीक संस्थेमार्फत नगर, नाशिक, पुणे या ठिकाणी मोफत सर्व जातीय वधू वर मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेले आहे. 67 वा मेळावा नगर शहरात वृंदावन लॉन्स, नगर मनमाड रोड अहमदनगर शहर येथे रविवार दिनांक 16 एप्रिल रोजी, चंदन नगर येथे रविवार दिनांक 30 एप्रिल रोजी तर मे च्या पहिल्या आठवड्यात नाशिक जिल्ह्यात सिन्नर येथे मोफत सर्व जातीय वधू वर मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेले आहे. जास्तीत जास्त वधू-वर पालकांनी या मेळाव्याचा लाभ घ्यावा. दिवसेंदिवस मुलांच्या लग्नाचा प्रश्न गंभीर होत चाललेला आहे. आता मुलीं ऐवजी मुलांच्या पालकांची चिंता वाढलेली आहे. मराठी सोयरिक संस्था ही महाराष्ट्रातील विश्वसनीय नावाजलेली शासन मान्य अशी विवाह संस्था आहे.

आतापर्यंत संस्थेकडून अडीच हजार लग्न पार पडलेले आहेत. इच्छुकांनी संस्थेच्या नगर शहरातील पाईपलाईन रोड, भिस्तबाग चौक या ठिकाणी संपर्क कार्यालयात 88 477 24 680 यावर संपर्क करावा असे आवाहन जगदंब फाउंडेशनचे व अहमदनगर जिल्हा कृषी कर्मचारी पतसंस्थेच्या संचालिका जयश्री कुटे, अंजना पठारे, प्रदीप पंजाबी, हरिदास जगताप, साहेबराव नवले, महेश पवार, जयवंत मोटे, प्रा योगेश कोतकर, अनिल अकोलकर, प्रा.संभाजी भोसले, नानासाहेब दानवे, अनिता कोतकर, मधुकर निकम, पारुनाथ ढोकळे, भास्कर नरसाळे, संतोष कानडे, अमोल साळवे, महेश गुंड, योगेश हजारे, आशिष शिंदे, प्रमोद झावरे यांच्यावतीने करण्यात आलेले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!