
शेवगाव मध्ये आषाढी एकादशी मुळे बकरी ईदच्या दिवशी कुर्बानी न करण्याचा ऐतिहासिक निर्णय..
शेवगाव (प्रतिनिधी) – आषाढी एकादशी आणि बकरी ईद (ईद-उल-अजहा) एकाच दिवशी येत आहे. त्या पार्श्वभुमीवर एकता, अखंडता आणि एकात्मतेची संस्कृती कायम रहावी. हिंदू-मुस्लीम ऐक्याची पताका सर्वदूर फडकत रहावी म्हणून हिंदू धर्मियांच्या भावनांचा आदर करत शेवगाव मधील मुस्लिम समाजाने आषाढी एकादशीमुळे बकरी ईदच्या दिवशी कुर्बानी न करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे हिंदू-मुस्लीम एकतेचं नातं आणखी बळकट झालं आहे. मुस्लीम समाजाने घेतलेला हा आदर्श निर्णय खरोखरच कौतुकास्पद आहे.आज शेवगाव शहरात दुपारी झालेल्या बैठकीत मुस्लिम समाजाने हा ऐतिहासिक निर्णय घेतला. आषाढी एकादशी आणि बकरी ईद एकाच दिवशी येत आहे. बकरी ईदच्या दिवशी मुस्लीम बांधव बकऱ्याची कुर्बानी देतात तर आषाढी एकादशीला उपवास असतो. दोन्ही पवित्र सणांचा अनोखा संगम त्यादिवशी असला तरी कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचे आव्हान पोलीसांपुढे, दोन्ही समाजापुढे होते. त्या अनुषंगाने शेवगाव मुस्लिम सामाजाने स्वतः पुढाकार घेत आषाढी एकादशीमुळे बकरी ईदच्या दिवशी कुर्बानी न करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला.
आणखीन काही महत्त्वाचे
ऑक्टोबर -२०२३ रोजी स्वच्छता अभियाना दिवशी पोलीस निरीक्षक संजय कुमार ब्राह्मणे यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छता मोहीम शहरात राबविण्यात आली…
१ ऑक्टोबर -२०२३ रोजी स्वच्छता अभियाना दिवशी पोलीस निरीक्षक संजय कुमार ब्राह्मणे यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छता मोहीम शहरात राबविण्यात आली... भारताचे...
पाथर्डी ग्रामपंचायत मधील डोंगरपाडा येथे अवकाळी पावसाने १४ घराचे मोठ्या प्रमाणात नुकसान..
पाथर्डी ग्रामपंचायत मधील डोंगरपाडा येथे अवकाळी पावसाने १४ घराचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले . बहुजन विकास आघाडीचे जव्हार तालुका अध्यक्ष...
गुंड प्रवृत्तीचे परप्रांतीयांकडून आदिवासी ग्रामसेवकाला बेदम मारहाण ..
गुंड प्रवृत्तीचे परप्रांतीयांकडून आदिवासी ग्रामसेवकाला बेदम मारहाण .. जव्हार शहरात बस स्टॅन्ड परिसरात परप्रांतीय लोकांचे फुलांचे मार्केट आहे..... या मार्केटमध्ये...
भारताचे यशस्वी पंतप्रधान मा. श्री नरेंद्र मोदीजी यांच्या ७४व्या वाढदिवसा निमित्त…
भारताचे पंतप्रधान यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन भारताचे यशस्वी पंतप्रधान मा. श्री नरेंद्र मोदीजी यांच्या ७४व्या वाढदिवसा निमित्त... सेवा पंधरवडा...
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन
भारताचे पंतप्रधान यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन भारताचे यशस्वी पंतप्रधान मा. श्री नरेंद्र मोदीजी यांच्या ७४व्या वाढदिवसा निमित्त सेवा पंधरवडा...
109 न दिल्यास गाळपाची परवानगी नाही साखर आयुक्त
नेवासा प्रतिनिधी सन 2021 22 मध्ये गळीत हंगामातील कपात केलेले १०९ रुपये शेतकऱ्यांना न दिल्यास लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर...