अपघाती मृत्युनंतर वारसाला मिळाले ₹.१० लाख,इंडिया पोस्ट पेमेंट्स बॅंकची मदत…

अपघाती मृत्युनंतर वारसाला मिळाले ₹.१० लाख

अपघातामधे मृत्यु झालेल्या खांडगाव ता.संगमनेर येथील तरुणाच्या कुटुंबीयांना पोस्टाच्या ₹.३९९/- अपघात विमा योजनेची तब्बल ₹.१० लाख रुपये भरपाई मिळाली आहे.
स्व. श्री.बाळासाहेब बागुल रा.खांडगाव यांचे काही दिवसांपूर्वी अपघाती निधन झाले होते.त्यानी त्याआधी *इंडिया पोस्ट पेमेंट्स बॅंकची ३९९ रु. हप्ता भरून “टाटा अपघात विमा”* घेतला होता.त्यांच्या मृत्युनंतर पत्नीने सर्व आवश्यक कागदपत्रे विमा कंपनीकड़े जमा केल्यावर .३ जुलै ला पत्नी अर्चना बागुल यांच्या खात्यावर कंपनीने *₹ १० लाख जमा* केले आहेत.तसेच यव्यतीरिक्त *2 मुलांच्या पूढ़ील शिक्षणासाठी सुद्धा त्यांना ₹. 1 लाख मदत मिळणार* आहे.यावेळी IPPB चे ब्रॅंच मॅनेजर मा.प्रतीक पाटील,संगमनेर पोस्टऑफिसचे पोस्टमास्तर मा.महेश कोबरणे,टाटाकंपनीतर्फ़े ऋषिकेश लांजेकर,अविनाश बधे तसेच खांडगाव चे सरपंच मा.भरत गुंजाळ पोस्टऑफिस च्या मोनाली वाकचौरे उपस्थित होत्या.
क्लेम सेटलमेंटसाठी आईपीपीबीचे असिस्टंट मॅनेजर स्वप्निल सावंत आणि राहुल सागडे यानी मदत केली.जास्तीत जास्त नागरिकांनी पोस्टाची अपघात विमा पॉलिसी घेऊन स्वतःला तसेच कुटुंबाला संरक्षीत करावे असे आवाहन श्रीरामपुर डाक विभागाचे अधीक्षक मा.हेमंत खडकीकर साहेब यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!