
109 न दिल्यास गाळपाची परवानगी नाही साखर आयुक्त
नेवासा प्रतिनिधी
सन 2021 22 मध्ये गळीत हंगामातील कपात केलेले १०९ रुपये शेतकऱ्यांना न दिल्यास लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्यास 2023 24 च्या गळीत हंगामाची परवानगी देणार नसल्याचे साखर आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार यांनी नेवाशाचे मा. आमदार बाळासाहेब मुरकुटे यांना सांगितले सन 2021 22 मध्ये गळीत झालेल्या उसाचे एफआरपी रकमेमधून ज्ञानेश्वर कारखान्याने 109 रुपये कपात केली होती एफ आर पी रकमेमधून कुठलीही कपात न करण्याचा केंद्र सरकारचे नियम असताना देखील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याने अनधिकृतपणे १०९ रुपये प्रति टनाने कपात करून शेतकऱ्यांवर अन्याय केलेला आहे या विरोधात आमदार मुरकुटे यांनी साखर आयुक्ताकडे वेळोवेळी तक्रारी केल्या तसेच ज्ञानेश्वर कारखान्यावर आंदोलने ही केली परंतु कारखान्याने 83 शेतकऱ्यांच्या खात्यावर १०९ रुपये प्रति टना प्रमाणे पेमेंट वर्ग केले व त्यानंतर ही प्रक्रिया थांबवली या विरोधात दिनांक 1 सप्टेंबर 2023 रोजी आमदार मुरकुटे यांचे नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी ज्ञानेश्वर कारखान्यावर धरणे आंदोलन करण्यात आले दिनांक 12 सप्टेंबर 2023 रोजी मा आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी साखर आयुक्तांकडे निवेदनाद्वारे सन 2021 22 मध्ये गळीत झालेल्या उसाचे १०९ रुपये टणाप्रमाणे शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करावे तसेच 2022-23 गणित हंगामाचे 3010/- रुपये टनाप्रमाणे उसाचे पेमेंट द्यावे तसेच असे न केल्यास येणाऱ्या गळीत हंगामात ज्ञानेश्वर कारखान्यास परवानगी देऊ नये अशी मागणी निवेदनाद्वारे केली यावर साखर आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार यांच्याकडे केली आहे. यावर साखर आयुक्तांनी आयुक्त कार्यालयाच्या आदेशाची अंमलबजावणी न केल्यास ज्ञानेश्वर कारखान्यास येत्या गळीत हंगामात परवानगी दिली जाणार नाही तसेच 109 रुपये तातडीने शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करण्याचे पुन्हा आदेश देतो असे साखर आयुक्तांनी मुरकुटे यांना सांगितले यावेळी भाजपाचे जिल्हा सचिव अंकुश काळे प्रसिद्धी प्रमुख रितेश भंडारी तालुका उपाध्यक्ष सूर्यकांत गुंड आदी उपस्थित होते.
प्रतिक्रिया
कपात केलेली १०९ रुपये जोपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग होत नाही तोपर्यंत स्वस्थ बसणार नाही 109 रुपये वर्ग न केल्यास येणाऱ्या गळीत हंगामात ज्ञानेश्वर कारखान्याला गळीत हंगामाची परवानगी न देण्याची मागणी केली आहे यावर साखर आयुक्तांनी 109 रुपये वर्ग न केल्यास ज्ञानेश्वर कारखान्यास गळीताची परवानगी मिळणार नसल्याचे ठणकावून सांगितले.
प्रतिनिधी :- वैभव जगताप महाराष्ट्र न्युज 10 (नेवासा )