बाळकुम येथील मुंबई विद्यापीठ उपकेंद्राची दुरावस्था

बाळकुम येथील मुंबई विद्यापीठ उपकेंद्राची दुरावस्था

बाळकूम येथे मुंबई विद्यापीठाचे केंद्र असून सदर विद्यापीठातून लाखो विद्यार्थी विविध प्रकारचे शिक्षण घेत असून येथे पाणी ,लाईट या मूलभूत सुविधांपासून वंचित राहून विद्यार्थ्यांना शिक्षण घ्यावे लागत आहे.या उपकेंद्रात मोठ्या प्रमाणात क्लास रूममधील छत कोसळलेले आहे तर अनेक अनेक ठिकाणी घाणीचे साम्राज्य निर्माण झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.मुंबई विद्यापीठाच्या पाशर्वभूमीवर विद्यार्थ्यांना ठाण्यात शिक्षणाच्या सुविधा मिळाव्यात यासाठी आरक्षित भूखंडावर ही भव्य इमारत येथे उभारून येथे हे उपकेंद्र सुरू करण्यात आले. मात्र या उपकेंद्रात लाईट नाही ,लायब्ररी ,जिमखाना ,कॅन्टीन ,बंद अवस्थेत आहेत.पैसे भरूनही प्रत्यक्षात विद्यार्थ्याना शिक्षणाच्या बाबतीत कोणत्याही सोयीसुविधा येथे उपलब्ध नसल्याने भाजपा युवा मोर्चाच्या वतीने आज आंदोलन करण्यात आले. मुख्यमंत्र्यांशी याबाबत चर्चा करून समस्यांचे निवारण करू असे आश्वासन विद्यार्थ्याना देण्यात आले . तसेच यासंदर्भात लवकरात लवकर उपाय योजना न केल्यास मुंबई विद्यापीठ उपकेंद्राला टाळे ठोकण्याचा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!