
गुंड प्रवृत्तीचे परप्रांतीयांकडून आदिवासी ग्रामसेवकाला बेदम मारहाण ..
गुंड प्रवृत्तीचे परप्रांतीयांकडून आदिवासी ग्रामसेवकाला बेदम मारहाण ..
जव्हार शहरात बस स्टॅन्ड परिसरात परप्रांतीय लोकांचे फुलांचे मार्केट आहे…..
या मार्केटमध्ये पंचम नावाने ओळखल्या जाणाऱ्या फुल विक्रेत्यांने आदिवासी समाजातील ग्रामसेवकाबरोबर दुचाकी पार्किंग लावण्यावरून शाब्दिक वाद घातला. त्यानंतर त्याचे रूपांतर बेदम मारहानित झाल्याची घटना बुधवारी दुपारी घडली ……
बुधवारी दुपारी दोनच्या दरम्यान अदिवासी ग्रामसेवक काही साहित्य खरेदीसाठी बस स्थानकाजवळ गेले होते ….
त्या हातगाडी समोर आदिवासी ग्रामसेवकांनी दुचाकी लावली त्या दुचाकी लावण्यावरून दोघांमध्ये किरकोळ वाद निर्माण झाला…..
त्या किरकोळ वादावरून फुल विक्रेता पंचम व त्याच्या साथीदाराने ग्रामसेवकाला बेदम मारहाण केली.सदर घटना
जव्हार पोलिसांना कळताच पोलिसांनी घटनास्थळी त्वरित धाव घेऊन फुल विक्रेत्याला ताब्यात घेतले आहे …
व ग्रामसेवकाला जव्हार कुटीर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले …
परप्रांतीय गुंड प्रवावृत्तीच्या फुल विक्रेत्याकडून आदिवासी ग्रामसेवकाला मारहाण झाल्याने तालुक्यातील आदिवासी युवा मंडळ एकत्र येऊन तणाव निर्माण झाला होता ….
झालेल्या मारहाणी नंतर आदिवासी संघर्ष समितीने जव्हार नगर परिषदेला रोड लगत असलेले हातगाडे हटवण्यासाठी मुख्याधिकारी यांना निवेदन दिले आहे….
सोमवार पर्यंत हातगाड्यांचे अतिक्रमण काढले नाही तर आदिवासी संघर्ष समिती हातगाडे स्वतः हटवेल असे निवेदन नगर परिषदेला देण्यात आले आहे ………….
बस स्थानका जवळ ज्या ठिकाणी वाद झाला त्या ठिकाणी रोड लगत फुल विक्रेत्यांनी मारहाण केली तो गुंड प्रवृत्तीच्या व्यक्ती आहे ….
अशा व्यक्तीला सर्व समाज एकत्र येऊन हद्दपार करा ….
परंतु अतिक्रमण हटवणे हा नगरपरिषदेचा अधिकार आहे नगर परिषदेने ते कायदेशीर करावे …………
एका गुंड प्रवृत्तीचा परप्रांतीय इसमाने गुंडागिरी केली तर त्याच्या त्रास दुसऱ्यांनी का भोगाव…
यामध्ये आदिवासी समाजातील गरीब लोकांचे हातगाडे सुद्धा आहेत तसेच सर्व समाजातील गोरगरीब नागरिकांचे दुकाने आहेत…
त्या गरीब हातगाडे वाल्यांना विनाकारण त्रास का…
शहरात अनेक ठिकाणी परप्रांतीय नागरिकांचे दुकान टपऱ्या हातगाडे आहेत ..
त्याच्यावरच त्यांच्या रोजगार व उदरनिर्वाह चालतो परंतु काही गुंड प्रवृत्तीचे क्रिमिनल डोक्याचे परप्रांतीय आहेत…
त्यांच्यावर लक्ष देऊन कडक कारवाई होणे गरजेचे आहे ..
अशी मागणी तालुक्यातून आदिवासी समाजाकडून मोठ्या प्रमाणात होत आहे…
जव्हार वरून जहीर शेख याचा रिपोर्ट।……