बाल गणेश मित्र मंडळ मांगेलवाडा रोप्य महोत्सवी पदार्पण मंडळाचा रोप्य महोत्सव..

बाल गणेश मित्र मंडळ मांगेलवाडा रोप्य महोत्सवी पदार्पण मंडळाचा रोप्य महोत्सव..
——— —— ——– —— ——–
जव्हार शहरातील मागेलवाडा येथील बाल गणेश मित्र मंडळाचे यंदाचे रोप्य महोत्सवी वर्ष असल्याने मंडळातर्फे विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते ….
या मंडळाने पाच दिवस लहान मुले व महिलांसाठी विविध खेळ स्पर्धा तसेच सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले होते …..
हे उपक्रम शहरातील नागरिकांमध्ये आकर्षणाचे केंद्र ठरले…
जव्हार मध्ये ऐतिहासिक राम मंदिर गणेशोत्सव मंडळ आहे ..
त्याचबरोबर शहरात दुसरा बालगणेश मित्र मंडळ असा आहे की यामध्ये लहान मुलांचे व महिलांसाठी खेळ घेतले जातात….
यंदाच्या वर्षी होऊ दे धिंगाणा, मंगळागौरी , कोळी नृत्य , हे महिलांसाठीचे कार्यक्रम विशेष लोकप्रिय ठरले …
पर्यावरणाचे भान राखून गणेश मूर्तीच्या आकारमान मर्यादित ठेवण्याची परंपरा आणि पाच दिवसाचा उत्सवाचा संकल्प यंदाही कटाक्षाने यावर्षीच्या मंडळाने नेहमीप्रमाणे जपला आहे , विसर्जनाच्या मिरवणुकीमध्ये पारंपारिक वेशभूषा , नृत्य , वाद्य , आणि सामाजिक सलोखा याचे दर्शन मंडळांनी घडविले आहे।….

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!