
ऑक्टोबर -२०२३ रोजी स्वच्छता अभियाना दिवशी पोलीस निरीक्षक संजय कुमार ब्राह्मणे यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छता मोहीम शहरात राबविण्यात आली…
१ ऑक्टोबर -२०२३ रोजी स्वच्छता अभियाना दिवशी पोलीस निरीक्षक संजय कुमार ब्राह्मणे यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छता मोहीम शहरात राबविण्यात आली…
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिनांक एक ऑक्टोबर २०२३ रोजी सकाळी १० वाजता देशातील सर्व नागरिकास एकत्रितपणे एक तास श्रमदानाचे आव्हान केले होते …………
त्या अनुषंगाने पालघर जिल्हा पोलीस दलाचे आस्थापने वरील सर्व पोलीस ठाणे हद्दीमध्ये पोलीस वसाहती , पोलीस ठाणे , तसेच पोलीस मुख्यालय ,स्थानिक नगर परिषद यांच्या समन्वयाने दिनांक एक ऑक्टोबर २०२३ रोजी सकाळी १० वाजता स्वच्छता अभियान मोहीम राबविण्यात आली ….
श्री बाळासाहेब पाटील पोलीस अधीक्षक पालघर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी……….
व सर्व पोलीस ठाणे, प्रभारी अधिकारी ,यांनी आपापले पोलीस ठाणे हद्दीमध्ये पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी व अंमलदार तसेच सर्व ग्रामीण भागातील स्थानिक नागरिक, लोकप्रतिनिधी ,शांतता कमिटी सदस्य ,पोलीस पाटील , तटरक्षक दल, स्थानिक लोक , प्राधिकरण कार्यालय ग्रामपंचायत शाळा व महाविद्यालयीन विद्यार्थी यांचे उत्स्फूर्त सहभागातून सदरचे स्वच्छता अभियान यशस्वीपणे राबविण्यात आले…..
जव्हार पोलीस स्टेशनचे अधिकारी पोलीस निरीक्षक संजय कुमार ब्राह्मणे व गोपनीय अमलदार राठोड सर यांच्या मार्गदर्शनाखाली जव्हार शहरातील प्रसिद्ध प्रतिष्ठित नागरिका बरोबर तसेच शाळेतील सर्व मुले मुली यांच्या सहभागातून सदर शहरातील स्वच्छता अभियान शहरातील पोलीस स्टेशन ,पोलीस लाईन ,बस स्टॅन्ड अशाप्रकारे अनेक ठिकाणी , परिसरात साफसफाई करून स्वच्छता दिन साजरा केला ….
तसेच शहरांमध्ये रॅली काढून लोकांमध्ये स्वच्छतेविषयी जनजागृती करण्यात आली ।…..
*जव्हार वरून जहीर हमीद शेख शेख यांचा रिपोर्ट।…..*