
चक्रीवादळ व मुसळधार पावसामुळे झालेल्या नुकसान बाबत निवेदन…
मा.जिल्हाधिकारी साहेब
आपत्ती व्यवस्थापन विभाग
पालघर
*विषय:चक्रीवादळ व मुसळधार पावसामुळे झालेल्या नुकसान बाबत.*
*पालघर जिल्हा पत्रकार :माधव तल्हा*
अचानक आलेल्या वादळामुळे आणि पावसामुळे आपल्या पालघर जिल्ह्यातील सर्वच नागरिकांना बऱ्याच संकटाना सामोरे जावे लागत आहे. सूर्या प्रकल्प अंतर्गत होणाऱ्या उन्हाळी भातशेतीचे अतोनात नुकसान झाले आहे.बऱ्याच शेतकऱ्यांनी शेतात भात कापून ठेवले होते ते काल आणि आज दिवसभर पावसाने वाहून गेले आहे,अशातच भात घरात नेण्या अगोदर शेतातच खराब झाले आहे.बऱ्याच शेतकऱ्यांचे भात अजून कापायचे बाकी आहे,परंतु वाऱ्यामुळे तेही सर्व झोडपून टाकले आहे . झोडणी झाल्यावर खराब पावळी ही यंदा खरेदी- विक्री होणार नाही.त्यामुळे पावसाळ्यासाठी घरात संसार उपयोगी लागणाऱ्या अन्य धान्य भरण्यासाठी ही शेतकऱ्यांना पैसे मिळणार नाही. आदिवासी भागातील शेतकऱ्याचा तोंडापशी आलेला घास जवळपास नष्ट झाला आहे.
ग्रामीण शहरी भागातील घरांचेही नुकसान झाले आहे, बागायतदार तसेच वाडी करणाऱ्या शेतकऱ्यांचे ही नुकसान झाले आहे.प्रत्येक घरात कोरोना व इतर आजारांमुळे लोक भयभीत झाले आहेत.तसेच लॉकडाउन मुळे लोकांच्या हाताला काम ही नाही.या सर्व बाबींचा विचार केला असता पालघर जिल्ह्यातील सर्वच नागरिकांना मोठ्या संकटाला सामोरे जावे लागत आहे.म्हणून १९ तारखेनंतर लगेचच प्रशासनाने झालेल्या नुकसानी बाबत प्रत्येक गावात जावून पंचनामे करून त्वरीत नुकसान भरपाई मिळावी यासाठी सहकार्य करावे.
महोदय,झालेल्या नुकसानीचे त्वरीत पंचनामे करून नुकसान भरपाई जाहीर करावी ही विनंती.
**अँड.विराज आर. गडग*
*( _सामाजिक कार्यकर्ता)*_*