मालेगाव तालुक्याचे आमदार मुफ्ती कास्मी इस्माईल यांची इन्सानियत फाउंडेशनला भेट..

शेवगाव प्रतिनिधी युनूस शेख

दिनांक 26 मे 2021रोजी मालेगाव तालुक्याचे आमदार मुफ्ती कास्मी इस्माईल यांनी शेवगाव शहरातील समाज सेवक म्हणून प्रसिद्ध असलेले इन्सानियत फाउंडेशन ला भेट दिली व इन्सानियत फाउंडेशनने लॉकडाउनच्या काळात गरीब ,भिकारी,दीनदुबळ्यांना व हॉस्पिटल मधील पेशंटला व त्यांच्या नातेवाईकांना ज्यांची जेवणाच्या डब्यांची सोय नाही त्यांना जेवणाचे डबे पोहोच केले त्याबद्दल त्यांचे आमदार मुफ्ती कास्मि इस्माईल यांनी कौतुक केले व पुढील समाज कार्यासाठी शुभेच्छा दिल्या तसेच पुढे समाजकार्य कसे करावे हे मार्गदर्शन केले आणि ज्या परिस्थितीतून भारत आणि संपूर्ण जगाची या कोरोना महामारीच्या रोगातून मुक्ती व्हावी यासाठी अल्लाह कडे दुवा केली यावेळी इन्सानियत फाऊंडेशनचे इस्माईल भाई ,रियाज भाई,इरफान भाई,हाफिज मुक्तार भाई,शब्बीर भाई ,बाबा भाई आदी उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!