
राजमाता अहिल्याबाई होळकर यांची 296 वी जयंती साजरी…
श्रीरामपूर प्रतिनिधी- इमरान शेख
(३१ मे १७२५–१३ ऑगस्ट १७९५). एक अतिशय दानशूर, कर्तृत्ववान, धर्मपरायण व कार्यक्षम राज्यकर्ती म्हणून अहिल्याबाई होळकर हे नाव मराठ्यांच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिले गेले आहे. त्यांचा जन्म चौंडी या छोट्याशा गावात (जिल्हा बीड) माणकोजी व सुशिलाबाई शिंदे या दांपत्यापोटी झाला. धनगर समाजात जन्मलेल्या अहिल्याबाईंचे लग्न वयाच्या आठव्या वर्षी सुभेदार मल्हारराव होळकर यांच्या मुलाशी, खंडेरावांशी झाले.
खंडेरावांच्या आईचे नाव गौतमीबाई होते; खंडेराव हे व्यसनी, छंदीफंदी होते. पण अहिल्याबाईंनी याबाबतीत तक्रार न करता सासऱ्यांनी नेमून दिलेल्या कामात लक्ष घातले. कुशाग्र बुद्धीची देणगी लाभलेल्या या सूनबाईंवर सासऱ्यांचा मोठा विश्वास होता आणि खूप महत्त्वाचा पत्रव्यवहार ते अहिल्याबाईंवरच सोपवीत असत. खंडेरावांपासून त्यांना दोन अपत्ये झाली. मालेराव हा मुलगा आणि मुक्ताबाई ही कन्या. अहिल्या-बाईंना वयाच्या अठ्ठाविसाव्या वर्षी वैधव्याला सामोरे जावे लागले.पती खंडेराव कुंभेरी येथे लढाईत मरण पावले. त्यावेळच्या प्रथेप्रमाणे त्या सती जायला निघाल्या. पण सासरे म्हणाले, “प्रजाहित…
*मल्हार सेना ग्रुप माळवाडगाव* येथे *राजमाता पुण्यश्लोक* अहिल्यादेवी होळकरयांची जयंती साध्यापद्धतीने साजरी करण्यात आली,
*प्रमुख उपस्थती* कारभारी शिंदे, रविंद्र शिंदे, ज्ञानेश्वर अनुसे , सुनिल अनुसे, वसंत काळे, नाना काळे, बाळासाहेब खताळ, संजय खताळ, गणेश खताळ,कार्तिक काळे,योगेश शिंदे, अमोल अनुसे, योगेश अनुसे, बबनराव अनुसे, विठ्ठल अनुसे, सारंगधर काळे, रविंद्र काळे,गणेश शिंदे, समर्थ थोरात, अफरोज पठाण ,पत्रकार इमरान शेख, पत्रकार संदिप आसने इ.