राहुरी तालुक्यातील वरवंडी मुळानगर येथे लसीकरण मोहीम.

राहुरी तालुका प्रतिनिधी ( युनूस शेख )

राहुरी तालुक्यातील वरवंडी ( मुळानगर ) येथे पुढील तीन ते चार दिवसात 45 वर्षावरील नागरिकांचे कोरोना लसीकरण शासनातर्फे राबविण्यात येणार आहे, त्यासाठी बंधनकारक असणारी कोरोना *RTPCR* ही चाचणी हा कॅम्प आरोग्य विभाग यांनी आयोजित केला होता, मुळानगर ग्रामस्थांना वरवंडी चार किलोमीटर हे अंतर दूरचे पडते ही ग्रामस्थांची अडचण समजून घेऊन ग्रामपंचायत सदस्य सलीमभाई शेख यांनी प्रयत्न करून आणि आरोग्य विभागाशी चर्चा करून हा कॅम्प मुळानगर गावात आयोजित केला. तसेच गावातील 45 वर्षावरील ग्रामस्थांचे लसीकरणार संबधी गैरसमज दूर केले. नागरिका मध्ये असलेली भीती दूर केली.स्वतः कॅम्प संपेपर्यंत पर्यंत केंद्रावर उपस्थित होते. ग्रामस्थांना प्रोत्साहन दिले कॅम्पचे नियोजन शासन नियमवाली नुसार शिस्तबद्ध करण्यात आले होते.यासाठी गावातील ग्रामपंचायत सरपंच भाऊसाहेब कोळेकर, सदस्या प्रियंकाताई त्रिभुवन, यांनी मदत केली.तसेच आरोग्य अधिकारी डॉ. अतुल शेटे, डॉ. तुषार कारंडे, ऑनलाईन नोंदणी खरात सर, आशा सेविका अर्चना पवार यांनी त्यांची जबाबदारी चोख व प्रामाणिक पार पाडली..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!