
राहुरी तालुक्यात वादळी वाऱ्यासह विजांचा कडकडाटासह पावसाची सुरूवात…
राहुरी तालुका प्रतिनिधी युनुस शेख
राहुरी शहरासह तालुक्यात काल दिनांक 1 जून पासूनच पावसाने जोरदार बॅटिंग करत सर्वसामान्यांचे पुरते हाल केले काल संध्याकाळी वादळी वाऱ्यासह व विजेच्या कडकडाटासह जोरदार पावसाच्या सरी कोसळल्याने राहुरी शहराससह तालुक्यातील रस्त्यावर खड्डे असलेल्या रस्त्यावर पाण्याचे डबके साचल्यामुळे अनेक दुचाकी चालक त्यात पडल्यामुळे दुचाकीचे नुकसान तर झाले पण यातच राहुरी तालुक्यात दोन दिवसापासून भयंकर उकाडा वाढला होता त्यातच सोमवारी संध्याकाळी 06.45 मि. वाजेच्या सुमारास अचानक ढग दाटून आले व सोसाट्याचा वारा वाहू लागला व काही क्षणातच विजेच्या कडकडाटासह पावसाच्या सरी कोसळल्या मात्र
काही वेळाने वारा थांबला मात्र पावसाने जोरदार बॅटिंग करत रात्रीचे नऊ वाजले तरी पाऊस काही थांबण्याचे नाव घेईना मात्र कुठे एकदाचा पाऊस थांबला पण त्यात महावितरण ची लाईट गायब झाली त्यामुळे महिला वर्गांची मोठी धावपळ झाली लाईट नसल्यामुळे स्वयंपाकाला उशीर झाला बाहेर सर्वत्र अंधार काळोख पडलेला होता पावसामुळे शहरातील काही झोपडपट्टी परिसरात ठिकठिकाणी पावसाचे पाणी साचले होते तर शहरातील रोडवर सुद्धा मोठ्या प्रमाणात पाणी वाहत होते अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची चांगलीच धावपळ उडाली यातच आज दिनांक 1 जून रोजी भारतीय हवामान विभागाने अहमदनगर जिल्ह्यात दिनांक 1,2,व 3 जून दरम्यान विजेच्या कडकडाटासह वादळी पावसाची शक्यता आहे यामध्ये वाऱ्याचा वेग 30 ते 40 किलोमीटर प्रति तास असण्याची शक्यता आहे तरी नागरिकांनी सतर्क राहून काळजी घ्यावी
🙏 शेख युनूस अहमदनगर प्रतिनिधी🌹🙏