
प्रशासन शेतकऱ्याच्या मुळावर : कुरकुंभ येथील रासायनिक कंपन्यांचा महाप्रताप..
*दौंड :- आलिम सय्यद*
दौंड तालुक्यातील कुरकुंभ येथील औद्योगिक वसाहत मधील दूषित केमिकल युक्त सांडपाणी पुणे- सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर तळ्याचं स्वरूप झालं होतं. मात्र हे दूषित केमिकलयुक्त सांडपाणी एका रात्रीतून महामार्गावरून या लागत असणाऱ्या शेतकऱ्यांच्या शेतात गेलं कसं हा चर्चेचा विषय बनला आहे.
मात्र हे दूषित केमिकल युक्त सांडपाणी शेतकऱ्यांच्या शेतात सोडलं कोणी यामध्ये कोण शामिल आहे. याची सखोल चौकशी होऊन होऊन संबंधीतावर कारवाई करण्याची गरज आहे.
याबाबत अशी माहिती की कुरकुंभ औद्योगिक वसाहत मधील काही अनेक रासायनिक कंपन्या कंपन्यांमधून निघणारे दूषित केमिकलयुक्त सांडपाणी कंपन्यांच्या बाहेर उघड्यावर सोडले जात असल्यामुळं हेच पाणी थेट पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर जमा झाले होते. हा प्रकार पंधरा ते वीस दिवसांपासून सुरू होता महामार्गाला तलावाचं स्वरूप आलं होतं. तब्बल या पाण्याची पातळी चार ते पाच फूट इतकी होती त्यामुळे पुणे बाजूने सोलापूर ला जाणारी वाहतूक विस्कळीत झाली होती. त्यामुळे अपघाताच्या घटना वाढल्या होत्या या ठिकाणी महामार्गावर दोन चार चाकीचा वाहनांचा सामोरा समोर धडक झाल्याने अपघात झाला होता यामध्ये चार जण जखमी झाले होते. हे महामार्गावर जमलेले सांडपाणी वाहन चालकांसाठी डोकेदुखी ठरत होता. हे सांडपाणी या ठिकाणी कोठून येत कोण सोडत याबाबत अस्पष्टता आहे परंतु हे पाणी नेमकं येतंय कोठून याची चौकशी करण्याऐवजी एका रात्रीतून हे पाणी शेतकऱ्यांच्या शेतात सोडलं कोणी याची चौकशी करून यामध्ये कोण कोण शामिल आहे.याबाबत संबंधित विभागाने चौकशी करून संबंधितावर कारवाई करावी अशी मांगणी शेतकरी तसेच गावकरी करत आहे
*कोणाच्या आदेश नसतानाही मोरी ( चारी ) कोणी काढली आणि माझ्या शेतात पूर्ण केमिकलयुक्त सांडपाणी आलंय याला जबाबदार असणाऱ्या कंपनी वर कारवाई करावी. व आमच्या झालेल्या शेतीचा पंचनामा करावा लवकरच या प्रदूषणाबाबत स्थानिक प्रतिनिधींना घेऊन आंदोलन करणार*
*रोहित कुलंगे*
*पीडित शेतकरी*