
पर्यावरण दिनानिमित्त शेवगांव काँग्रेसचा उपक्रम
गोरगरिबांसाठी काँग्रेसचे किराणा टूलकिट
शेवगाव प्रतिनिधी युनूस शेख
दि. ५ जून, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा माजी विधानसभा अध्यक्ष आमदार नानाभाऊ पटोले यांच्या वाढदिवसानिमित्त आज शेवगांव तालुका काँग्रेसच्या वतीने वेगवेगळे उपक्रम करण्यात आले. यावेळी शेवगांव तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष डॉ. अमोल फडके यांच्या हस्ते शहरातील गरजू अपंग महिलांना किराणा किट चे वाटप करण्यात आले. तसेच आमदार नाना पटोले यांचा वाढदिवस व पर्यावरण दिनानिमित्त काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष पांडुरंग नाबदे यांनी 5000 सीड बॉल तयार केले. तहसीलदार यांच्या कार्यालयातील पुरवठा निरीक्षक श्री चिंतामणी साहेब यांच्याकडे सीड बॉल सुपूर्द करण्यात आले असून हे ‘सीड बॉल तहसीलदारांमार्फत वन विभागाकडे सुपूर्द करण्यात यावे’ अशी विनंती शेवगाव काँग्रेस कमिटीच्या वतीने तहसील कार्यालयास करण्यात आली.
यावेळी शेवगाव तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष डॉ. अमोल फडके यांच्यासह तालुका युवकचे अध्यक्ष बब्रु वडघने, शहराध्यक्ष किशोर कापरे, युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष गणेश भैय्या क्षीरसागर, ज्येष्ठ पत्रकार निजाम भाई पटेल, महिला काँग्रेसच्या अध्यक्षा श्रीमती कल्पना ताई खंडागळे, काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष पांडुरंग नाबदे, शिवाजी वडघने आदी उपस्थित होते.
आणखीन काही महत्त्वाचे
दौंड तालुक्यातील कुरकुंभ बारामती रस्त्यावर जिरेगाव हद्दीत एका तरुणाचा खून..
दौंड:-आलिम सय्यद दौंड तालुक्यातील पारगाव येथील निर्घृण हत्याकांड झाल्याची घटना ताजी असतानाच आज कुरकुंभ- बारामती महामार्गावरील जिरेगाव गावच्या हद्दीत एका...
आनंदी जीवन फाउंडेशनच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार तर १२० विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप..
दौंड:- आलिम सय्यद, दौड तालुक्याच्या पश्चिम भागातील जावजीबुवाची वाडी येथील प्राथमिक शाळेतील इयत्ता १ ली ते इयत्ता ७ वी मधील...
राज्य शासनाकडून विश्वा लॅब कंपनीला उत्कृष्ट लघुउद्योजक पुरस्कार..
दौंड :- आलिम सय्यद पुणे जिल्ह्याच्या दौंड तालुक्यातील कुरकुंभ औद्योगिक वसाहत मधील विश्वा लॅबोरेटरीज प्रा. लि. या औषध निर्मिती कंपनीला...
जव्हार मर्चंट नागरी सहकारी (पतसंस्था) .बँक निवडणुकीची मतदार सभासदांची यादी जाहीर…
जव्हारचे राजे श्रीमंत यशवंतराव मुकणे महाराजांनी स्थापन केलेली जव्हार अर्बन बँक . आज या बँकेला १०० वर्षे पूर्ण होऊन गेले...
पौष्टिक तृणधान्य आहारात गरजेचे – राहुल माने..
दौंड:- आलिम सय्यद, दौंड तालुक्यातील पांढरेवाडी येथे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2022-23 निमित्त पौष्टिक तृणधान्य लागवड व त्याचे आहारातील महत्व...
धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या स्मरणार्थ कुरकुंभ येथे क्रिकेट चे स्पर्धाचे आयोजन..
दौंड:- आलिम सय्यद, दौंड तालुक्यातील कुरकुंभ येथे धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या स्मरणार्थ छत्रपती करंडक 2023 कुरकुंभ क्रिकेट चे स्पर्धा...