
मॅजिक बस संस्थेने पुढाकार घेऊन विध्यर्थांना ऑनलाइन पद्धतीने जीवन कौशल्य शिकविण्याचे कार्य..
दौंड :- आलिम सय्यद
कोरोनाचा गेल्या दोन वर्षांपासुन प्रादुर्भाव लक्षात घेता, विध्यार्थ्यांच्या शिक्षणात खंडतेचा सामना करावा लागत आहे. ऑनलाइन शिक्षण असले तरी अभ्यासाव्यतिरिक्त शिक्षणाने मौलिक विचार करायला भाग पाडले जाते. हेच हेरून मॅजिक बस या संस्थेने दौंड तालुक्यातील अठरा गावांमधील एकोणीस शाळांतील एकूण चार हजार सातशे विद्यार्थ्यांना विविध सामाजिक , बौद्धिक विषयांवर विविध उपक्रमांमधून शिक्षण दिले जात आहे त्यामुळे विद्यार्थी वर्गामध्ये उत्साह आहे.
विध्यर्थांच्या बौद्धिक विकासाला चालना देण्यासाठी ऑनलाइन अभ्यासवर्ग चालू असल्याने पालकांनी समाधान व्यक्त केले आहे.
कोरोना काळात विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी मॅजिक बस संस्थेचे वरिष्ठ जिल्हा कार्यक्रम अधिकारी पराग सर यांच्या मार्गदर्शन व नेतृत्वाखाली दौंड तालुक्यातील शाळांमध्ये कार्यक्रमांतर्गत बारा ते सोळा वर्ष वयोगटातील चार हजार सातशे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी खेळांद्वारे ‘शिक्षण व जीवनकौशल्य विकास’ हा कार्यक्रम मागील तीन वर्षांपासून अविरतपणे राबविला जात आहे.
सध्याच्या परिस्थितीमध्ये शाळा बंद आहेत तेव्हापासून मॅजिक बस संस्थेच्या वतीने पुढाकार घेऊन विध्यर्थांना ऑनलाइन पद्धतीने जीवन कौशल्य शिकविण्याचे कार्य कोरोना काळातही अविरतपणे चालू आहे.
त्यामागील मुख्य हेतू असा की, विद्यार्थ्यांमध्ये जीवन कौशल्य रुजवीत शाळेतील इतर विषय जसे की भाषा, गणित, विज्ञान आदी विषयांच्या अध्ययनात खंड पडू नये.
या हेतूने मॅजिक बस संस्थेचे कर्मचारी व गावातील समुदाय समन्वयक सातत्याने प्रयत्नशील आहेत. हा अभिनव उपक्रम यशस्वी करण्यासाठी तालुका समन्वयक राहुल आरे, मॅजिक बस संस्थेची टीम आणि गावांमधील समन्वयक यासोबतच विद्यार्थ्यांचे पालक हे परिश्रम घेत असल्याचे दिसून आले.