कुरकुंभ गावच्या उपसरपंच पदी विनोद शितोळे यांची बिनविरोध निवड…

दौंड प्रतिनिधी :- आलिम सय्यद

दौंड तालुक्यातील कुरकुंभ गावच्या उपसरपंचपदी जे. पी लॅबरोट्रीज कंपनीचे मॅनेजर, विनोद नरसिंग शितोळे यांची बिनविरोध निवड झाली. कुरकुंभ गावच्या उपसरपंचपदासाठी बुधवार दि.०९ )जून रोजी कुरकुंभ ग्रामपंचायत कार्यालय येथे उपसरपंच पदासाठी निवडणूक घेण्यात आली. सायराबी रफिक शेख यांनी उपसरपंच पदाचा राजीनामा दिल्याने ही उपसरपंचपदाची रिक्त झालेली जागेची निवडणूक घेण्यात आली. या वेळी एकूण दोन अर्ज दाखल झाले होते. यामध्ये उमेश सोनवणे व विनोद शितोळे हे दोन अर्ज दाखल झाले होते. तर उमेश सोनवणे यांनी दाखल केलेला अर्ज माघार घेतल्याने विनोद शितोळे यांची बिनविरोध उपसरपंचपदी निवड झाली. यावेळी निवडणूक अध्यासी अधिकारी म्हणून सरपंच राहुल भोसले यांनी काम पाहिले. तसेच सरपंच भोसले यांनी विनोद शितोळे यांची बिनविरोध उपसरपंचपदी निवड झाल्याचे घोषित केले. यावेळी ग्रामसेवक ताराचंद जगताप व सर्व ग्रामपंचायत सदस्य उपस्तिथ होते. यावेळी सरपंच,ग्रामसेवक सर्व ग्रामपंचायत सदस्य यांनी विनोद शितोळे यांना उपसरपंच पदी निवड झाल्याबद्दल शुभेच्छा दिल्या.

*कुरकुंभ औद्योगिक वसाहत मधील कंपन्याचे सी एस आर या फंडाच्या माध्यमातून गावातील विकास कामांना भर देणार*

*विनोद शितोळे*
*उपसरपंच, ग्रामपंचायत कुरकुंभ*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!