मा. आमदार डॉक्टर नरेंद्र घुले पाटील साहेब यांचा वाढदिवस श्रीराम विद्यालय देवगाव येथे साजरा..

जनता शिक्षण प्रसारक मंडळ, दहिगावने चे, अध्यक्ष व लोकनेते मारुतराव घुले पाटील संत ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखाना लिमिटेड, भेंडाचे विद्यमान चेअरमन, मा. आमदार डॉक्टर नरेंद्र घुले पाटील साहेब यांचा आज वाढदिवस ,श्रीराम विद्यालय, देवगाव .येथे साजरा करण्यात आला. याप्रसंगी शालेय स्थानिक कमिटीचे, अध्यक्ष ,श्री. कचर दास जी गुंदेचा व विद्यालयातील सेवा जेष्ठ शिक्षक श्री शेरे सर,श्री. गर्जे सर श्री. परदेशी सर व श्रीमती भराट मॅडम, श्रीमती कर्डिले मॅडम, शिक्षकेतर दत्तात्रय निकम या सर्वांच्या शुभ हस्ते विद्यालयांमध्ये वृक्षारोपण करण्यात आले ,तसेच ऑनलाइन शुभ संदेश व शुभेच्छा देण्यात आल्या. आदरणीय श्री.कचरदास गुंदेंच्या यांनी साहेबांना शुभेच्छा दिल्या व वेळोवेळी या शाळेसाठी कायम स्वरुपी शाळेच्या गरजा पूर्ण करण्यासाठी केलेल्या सहकार्याबद्दल साहेबांचे ऋण व्यक्त केले .कोरणा या आजारामुळे शाळा बंद आहेत पण ऑनलाईन शिक्षण सुरू आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांची उपस्थिती नव्हती, म्हणून यावर्षी अत्यंत साध्या प्रकारे सोशल डिस्टंसिंग ठेवून , सर्वांनी मास्कचा वापर करून व सनी टायझर वापरून हा कार्यक्रम पार पाडण्यात आला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री शैरे सर यांनी केले व आभार श्री परदेशी सर यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!