
खा.राहुल गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त दिव्यांगांना मास्क व सॅनिटायझर वाटप
खा.राहुल गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त दिव्यांगांना मास्क व सॅनिटायझर वाटप
संकल्प दिनानीमीत्त कॉग्रेस कमीटी शेवगाव तालुकाध्यक्ष डॉ.अमोल फडके यांचा आदर्श उपक्रम
शेवगाव प्रतिनिधी युनूस शेख
काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय नेते व खा. राहुल गांधी
यांच्या वाढदिवसानिमित्त शेवगाव तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने संकल्प दिन म्हणुन साजरा करण्यात आला. वाढदिवसाचा अनावश्यक खर्चास फाटा देवुन शेवगाव तालुका काँग्रेसचे अध्यक्ष डॉ. अमोल फडके यांच्या नेतृत्वात शेवगाव शहरातील दिव्यांगांना मास्क व सॅनिटायझर चे वाटप करण्यात आले.
खा.राहुल गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त काँग्रेस पक्षातर्फे पूर्ण देशात संकल्प दिन साजरा करण्यात आला असून या निमित्ताने दिव्यांग बांधवाना सॅनिटायझर व मास्क वाटप करून वाढदिवस साजरा केल्याबद्दल सावली दिव्यांग संघटनेचे तालुका अध्यक्ष चाँद शेख यांनी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष डॉ अमोल फडके यांचे आभार मानले यावेळी सावलीचे चांद शेख म्हणाले की वंचीत घटकांना मुख्य प्रवाहात आणणे हे कॉग्रेस पक्षाचे ध्येय होते व आहे.पक्षांच्या विचारांचा वारसा चालवत आज शेवगाव शहरात घेण्यात आलेला उपक्रम स्तुत्य असुन प्रेरणादायक आहे.
याप्रसंगी सावली दिव्यांग संघटनेचे शहर अध्यक्ष गणेश महाजन यांच्या हस्ते दिव्यांग बांधवाना सॅनिटायझर व मास्क वाटप करण्यात आले.यावेळी कॉग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष डॉ अमोल फडके,युवक अध्यक्ष बब्रु वडघने,शहराध्यक्ष किशोर कापरे यांच्यासह सावली दिव्यांग संघटनेचे चाँद शेख,गणेश महाजन शहराध्यक्ष किशोर कापरे,यांनी आपले मनोगत व्यक्त केले.यावेळी काँग्रेसचे कमिटीचे तालुका अध्यक्ष डॉ अमोल फडके,युवक काँग्रेसचे अध्यक्ष बब्रु वडघने,युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष गणेश क्षीरसागर,सावली दिव्यांग संघटनेचे चाँद शेख,सचिव नवनाथ औटी,शहर अध्यक्ष गणेश महाजन,उपाध्यक्ष सुनील वाळके,सचिव गणेश तमानके,राहुल नगरकर आदी दिव्यांग बांधव उपस्थित होते.