दौंड तालुक्यातील पाटस दुहेरी हत्याकांडातील आरोपी 12 तासाच्या आत जेरबंद पुणे ग्रामीण गुन्हे शाखेचे कामगिरी

दौंड प्रतिनिधी :- आलिम सय्यद,

दौंड तालुक्यातील पाटस येथे दोघांना तलवार व काठ्यांनी मारहाण करून दगडाने डोकं ठेचून निर्घुणपणे केलेल्या दुहेरी हत्याकांडातील चौघे आरोपी जेरबंद केल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांनी दिली.

पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील पाटस येथे ( ता ४ ) जुलै रोजी रात्री १० वा. चे सुमारास पाटस, तामखडा येथील भानोबा मंदिराचे समोर महेश उर्फ मन्या भागवत याने शिवम शितकल यास फोनवरुन आई बहिणीवरुन शिवीगाळ करून दम देवून तामखडा येथे बोलविलेवरुन शिवम संतोष शितकल व गणेश रमेश माकर हे दोघे रा.पाटस अंबिकानगर ता.दौंड जि.पुणे हे शिव्या का दिल्या याचा जाब विचारणेसाठी तामखडा येथे गेले असता तेथे आरोपी नामे महेश उर्फ मन्या संजय भागवत, महेश मारुती टुले रा.पाटस, तामखडा ता.दौंड जि.पुणे व त्याचेसोबतचे अनोळखी साथीदार यांनी शिवम संतोष शितकल वय २३ वर्षे व गणेश रमेश माकर वय २३ वर्षे या दोघांना तलवार, काठयांनी जबर मारहाण करुन खाली पाडून त्यांचे डोक्यावर दगड मारुन चेंदामेंदा करुन निघृणपणे दोघांचा खुन करुन पळून गेलेबाबत यवत पोलीस स्टेशनला खुन व आर्म ॲक्ट प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला होता.

सदर गुन्हा गंभीर स्वरुपाचा असल्याने व खुन करून आरोपी फरारी झालेने गुन्हयाचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखेमार्फत करणेबाबत पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी आदेश दिलेले होते . त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस वरिष्ठ पद्माकर घनवट यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रामेश्वर धोंडगे, महेश गायकवाड, निलेश कदम, दत्ता तांबे, सचिन गायकवाड, सुभाष राऊत, गुरु गायकवाड, अभिजित एकाशिंगे, काशिनाथ राजापुरे, शब्बीर पठाण, विद्याधर निचित प्रमोद नवले, गुरु जाधव यांचे पथक नेमण्यात आलेले होते. यवत पोलीस स्टेशन कडूनही गुन्हयाचे तपासासाठी दोन पथके नेमण्यात आली होती. स्थानिक गुन्हे शाखेचे पथक तपास करीत असताना गुन्हयातील आरोपी हे बारामती एअरपोर्ट रोड येथील फॉरेस्टमध्ये लपून बसल्याची माहिती मिळाली होती. गुन्हे शाखेचे पथकाने त्या ठिकाणी जाऊन सापळा रचून फरारी झालेले आरोपी १) महेश उर्फ मन्या संजय भागवत वय २२ वर्षे रा.पाटस , तामखडा ता.दौंड जि.पुणे २) महेश मारुती टुले वय २० वर्षे रा.पाटस , तामखडा ता.दौंड जि.पुणे ३) युवराज रामदास शिंदे वय १९ वर्षे रा.गिरीम , मदनेवस्ती ता.दौंड जि.पुणे ४) गहिनीनाथ बबन माने वय १९ वर्षे रा.गिरीम , रोघोबानगर ता.दौंड जि.पुणे यांना ताब्यात घेतलेले आहे. सदर आरोपींनी गुन्हयाची कबुली दिलेली असून आरोपींना पुढील कारवाईसाठी यवत पोलीस स्टेशनचे ताब्यात दिलेले आहे. उपविभागीय पोलीस अधीक्षक राहूल धस यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील अधिक तपास यवत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील हे करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!