दोन युवकांचा तलवारीने वार करून व डोक्यात दगड घालून निर्घृण हत्या : हत्या करून आरोपी फरार

दोन युवकांचा तलवारीने वार करून व डोक्यात दगड घालून निर्घृण हत्या : हत्या करून आरोपी फरार

दौंड-पुणे प्रतिनिधी:-आलिम सय्यद,

पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यामधील पाटस गावच्या हद्दीतील तामखडा येथे जुन्या भांडणाचा राग मनात धरून दोघा जणांचा निर्घृण खून करण्यात आला असून घटनेतील आरोपी फरार झाले आहेत. आरोपींच्या अटके साठी तीन पथक तयार करून रवाना केली असल्याचे यावेळी पोलिसांनी सांगितले.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, मयत शिवम संतोष शितकल (वय २३) व गणेश रमेश माखर (वय २३, दोघे रा. अंबिकानगर, पाटस, ता. दौंड, पुणे) या दोन तरुणांचा ( ता. ४ जुलै) रोजी दुपारच्या सुमारास तामखडा येथे काही जणांबरोबर वाद झाला होता. त्यानंतर वातावरण शांत झाले आहे असे वाटत असतानाच रात्री १० च्या सुमारास हे दोन तरुण पुन्हा तामखड्यात आले. यावेळी फोनवरून शिव्या का दिल्या याचा जाब आरोपी मन्या उर्फ महेश संजय भागवत, महेश टुले (दोघे रा. तामखडा, पाटस), योगेश शिंदे (रा. गिरीम, ता. दौंड) व इतर अनोळखी पाच-सहाजण यांना विचारला असता या दोघांवर तलवारीने सपासप वार करण्यात आले व नंतर डोक्यात दगड घालून निर्घृण खून करण्यात आला. घटनेनंतर सर्व आरोपी फरार झाले. याबाबत अर्जुन संभाजी माखर (वय १९) याने फिर्याद दिल्याने आरोपींविरुद्ध भा द वि कलम
३०२,१४१,१४६,१४७, १४८, १४९, ५०४, ५०६,
, शस्र अधिनियम ४/२५ नुसार खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

घटनेची माहिती मिळताच पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ अभिनव देशमुख , बारामती अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते , दौंड उपविभागीय पोलीस अधिकारी राहूल धस, यवतचे पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील, पाटसचे पोलीस उपनिरीक्षक संजय नागरगोजे यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली आरोपींच्या शोधासाठी तीन पथक तयार केले असून पथक रवाना केले असल्याचे यावेळी पोलिसांनी सांगितले, आरोपी लवकरच अटक करण्यात येतील, पाटस येथील परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात आहे,तरी पाटसच्या ग्रामस्थांनी कोणत्याही प्रकारच्या अफवा पसरवू नये,आणि घाबरून जाऊ नये असे आवाहन यावेळी पोलिसांनी पाटसच्या ग्रामस्थांना केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!