
आमदार कूल यांच्या सहकार्याने ग्रामीण भागातील मुलींच्या उच्च शिक्षणाचा मार्ग झाला सुकर…
दौंड प्रतिनिधी:- आलिम सय्यद
दौंड तालुक्यातील ग्रामीण भागातील मुलींच्या शिक्षणाचा मार्ग सुकर होण्याच्या दृष्टीने वासुंदे येथील गुरुकृपा माध्यमिक विद्यालयास दर्जावाढ करत अकरावी,बारावी, कला वाणिज्य विज्ञान या तिन्ही तुकड्यांना आमदार कुल यांच्या सहकार्याने मान्यता मिळाली असल्याने प्रामुख्याने ग्रामीण भागातील मुलींच्या शिक्षणाचा मार्ग सुकर झाला आहे…
यापुर्वी ग्रामीण भागातील मुलींना शिक्षणासाठी प्रामुख्याने शहरी भागात किंवा तालुक्याच्या ठिकाणी जावे लागत होते, मात्र तालुक्याच्या व शहरी भागात शिक्षण घेणे खर्चिक बाब असल्याने गोरगरीब, शेतकरी कुटुंबातील अनेक मुली शिक्षणापासून वंचित राहत होत्या.. तसेच मुलींना सुरक्षेच्या कारणास्तव बाहेरगावी उच्च शिक्षणासाठी पाठवण्यास कुटुंबीय टाळाटाळ करतात,
याचीच दखल घेत संचालक मंडळाने मुलीच्या शिक्षणासाठी दर्जावाढ करण्याचा निर्णय घेवुन मुलींना शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला.या निर्णयाचे आमदार राहुल कुल यांनी स्वागत करुन सदरचा प्रस्ताव यांनी विशेष लक्ष घालून तात्काळ मंजूर करून दिला असल्याचे संस्थेचे सचिव प्रा.कुलदिप यादव यांनी सांगितले.
सध्या येथील सुरू असलेल्या पाचवी ते दहावी वर्गामध्ये मुलांपेक्षा मुलींची संख्या जास्त आहे मात्र पुढील शिक्षणाची सोय नसल्याने मुलींचे शिक्षण स्थगित होते हीच बाब लक्षात घेऊन मुलींच्या शिक्षणाचा मार्ग सुकर करण्यासाठी संस्था सदैव तत्पर रहिल.
मानसिंग साळुंकेअ
ध्यक्ष भैरवनाथ शिक्षण प्रसारक मंडळ
उच्च माध्यमिक शिक्षणाची सोय वासुंदे येथे उपलब्ध झाल्याने बेताची परिस्थिती असलेल्या पाल्यांना शैक्षणिक ध्येयापर्यंत पोहचता येईल,या निर्णयामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा मार्ग सुकर होईल…
हरिदास लाळगे, माजी सरपंच जिरेगाव