बहुजन मुक्ती पार्टीचे वीज बिल व सक्तीने वसुली विरोधात दौंड येथे सरकारला कंदील भेट आंदोलन

दौंड :- आलिम सय्यद

वाढीव वीज बिल व सक्तीने वसुली करण्यासाठी वीजपुरवठा खंडित करून नागरिकांची गळचेपी करणाऱ्या राज्य सरकार आणि विद्युत वितरण कंपनीच्या विरोधात बहुजन मुक्ती पार्टीचे सरकारला कंदील भेट आंदोलन (६ जुलै) रोजी दौंड तहसिल कार्यालय येथे करण्यात आले. एकीकडे जनता लॉकडाऊन व कोरोनाच्या महाभयंकर परिस्थितीमुळे संकटात सापडली आहे, दुसरीकडे महागाई गगनाला भिडली आहे. तरी वीज बिल माफ करण्याऐवजी सरकार वीजपुरवठा खंडित करून शेतकरी, दुकानदार सर्वसामान्य नागरिकांची गळचेपीच करत आहे याकरिता हे आंदोलन करण्यात आले.

या आंदोलनावेळी प्रमुख मागण्या करण्यात आल्या यामध्ये दोनशे युनिट पर्यंतचे वीजबिल माफ करण्यात यावे, मीटर भाडे कपात करण्यात यावे., विजेचा स्थिर आकार व प्राथमिक भाव प्रमाणे दर आकारणी करावी., सक्ती ची वीज बिल वसुली तात्काळ थांबवावी.
तसेच ज्या ग्राहकांनी वीज बिल मार्च दोन हजार वीस पासून भरले त्याचे साठी अभय योजना तयार करावी व पुढील वर्षभरात वीजबिल निल पाठवावे. ३० दिवसानंतर रिडींग घेणाऱ्या व्यक्तीवर दंडात्मक कारवाई करण्यात यावी. अशी मांगणी यावेळी करण्यात आली. यावेळी सरकारला कंदील भेट आंदोलन करण्यात आलं
या प्रसंगी महावितरणचे अधिकारी वैभव पाटिल तसेच दौंड पोलिस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक पालवे तसेच महसुल विभागाचे जाधव यांना निवेदन देऊन कंदील भेट देण्यात आला. या प्रसंगी बहुजन मुक्ती पार्टीचे जिल्हाध्यक्ष गोरक्ष बारवकर दौंड तालुका अध्यक्ष गोरख फुलारी युवा आघाडीचे लखन जाधव, इरफान सय्यद, मनोहर कोकरे महिला आघाडीच्या पुष्पा बनकर, सुनिता आडसुळ, रविना दुर्गूडे, पुनम जाधव, पुजा शिंदे, छाया भोसले, पल्लवी जगताप, रामचंद्र भागवत, सागर भागवत अमोल भोपाळ, शेतकरी संघटनेचे राजाभाऊ कदम बहुजन क्रांती मोर्चाचे निलेश बनकर, अशोक मोरे, डॉ. दत्तात्रय जगताप, आखिल भारतीय ग्राहक पंचायत चे दौंड ता. अध्यक्ष अनिल नेवसे, पिपल्स रिपब्लीकन पार्टी यादव जाधव
आर. पी. आय. चे नवनाथ गायकवाड तसेच आदी कार्यकर्ते आंदोलना वेळी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!