
पांढरेवाडी येथे एक लस एक वृक्ष अभियान
दौंड प्रतिनिधी:-आलिम सय्यद
दौंड तालुक्यातील पांढरेवाडी गावात ग्रामपंचायत व आरोग्य विभाग यांचे संयुक्त विद्यमाने कोवीड लसीकरण कॅम्प आयोजित करुन “एक लस, एक वृक्ष” असा नाविन्य पुर्ण उपक्रम राबवला. दौंड तालुका आरोग्य अधिकारी डॉ सुरेखा पोळ यांच्या हस्ते या उपक्रमाचे उदघाटन करण्यात आले. लस घेतलेल्या प्रत्येक व्यक्तीस एक वृक्ष देऊन प्रोत्साहन दिले व लसीकरणाचे महत्व पटवून दिले गावातील दोनशे नागरिकांना पहिला व दुसरा लसीचा डोस दिला या लसीकरण कॅम्प साठी विशेष सहकार्य कुरकूंभ आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ उत्तम कांबळे, डॉ.राजेश पाखरे, डॉ. रुपाली भागवत, आरोग्य सहाय्यक पी.बी. कोळी, के.अ. जमादार तसेच परिचारिका एस. व्ही. डोंगरे, आशा सेविका सुवर्णा भागवत, वंदना झगडे,सोनाली कुंभार यांचे कार्य लाभले.
यावेळी सरपंच छाया झगडे, पोलीस पाटील विलास येचकर, ग्रामसेवक संजय यादव, वन कर्मचारी जालींदर झगडे, तसेच ग्रामपंचायत सदस्य व लस घेणारे नागरिक कोरोनाचे नियमांचे पालन करुन मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आणखीन काही महत्त्वाचे
दौंड तालुक्यात “शिव संपर्क” अभियानास सुरवात….
खासदार कृपाल तुमाने यांनी घेतली प्रमुख पदाधिका-यांसोबत बैठक ! दौंड :आलिम सय्यद , आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना...
कुरकुंभ एम आयडीसी चौकात पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात: एक ठार तर तीन जण गंभीर जखमी…
दौंड- पुणे :- आलिम सय्यद, पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील कुरकुंभ (ता.दौंड) एमआयडीसी चौकात दोन चारचाकी वाहनांचा भीषण अपघात झाला..यामध्ये पुण्याकडून सोलापूर...
गावठी हातभटटी दारूची वाहतुक करणाऱ्याला यवत पोलिसांनी ठोकल्या बेड्या..
दौंड:- आलिम सय्यद, सोलापुर- पुणे राष्टीय महामार्गावरील दौंड तालुक्यातील पाटस गावच्या हद्दीत पाटस टोलनाका येथे हातभटटी दारू वाहतुक करणाऱ्यास जेरबंद...
कुरकुंभ, पाटस, रावणगाव, खडकी, येथे मटका अन्य अवैद्य धंद्यांचा सुळसुळाट
कुरकुंभ, पाटस, रावणगाव, खडकी, येथे मटका अन्य अवैद्य धंद्यांचा सुळसुळाट दौंड : आलिम सय्यद दौंड तालुक्यातील कुरकुंभ, पाटस, रावणगाव, खडकी,...
आपण स्वतःसाठी रोजच जगतो,थोडं दुसऱ्यांसाठी जगूया…
आपण स्वतःसाठी रोजच जगतो,थोडं दुसऱ्यांसाठी जगूया... या तत्त्वावर श्री. श्याम सुंदर महाराज यांच्याकडून जनजागृती आज रोजी अजिंक्यक्रांती फाऊंडेशन हा सामाजिक...
तिसऱ्या कुरकुंभ मोरीच्या कामासाठी आवश्यक असणाऱ्या मेगा ब्लॉकला परवानगी – आमदार राहुल कुल
केंद्रीय रेल्व राज्यमंत्री रावसाहेब पाटिल दानवे यांच्या बरोबर झालेल्या बैठकीला यश दौंड:- आलिम सय्यद, दौंड शहारातील तिसऱ्या कुरकुंभ मोरीच्या...