
दौंड तालुक्यात तलाठ्याला लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंघेहात पकडले
दौंड : आलिम सय्यद
दौंड तालुक्यातील दहिटने येथिल तलाठ्याला सातबारा उताऱ्यावरील भोगवटा वर्गचा शेरा कमी करण्यासाठी ३० हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले.
सदरची कारवाई गुरुवार (ता.०७) रोजी दौंड तालुक्यातील दहिटणे येथील तलाठी कार्यालयात करण्यात आली. तलाठी कुंडलिक नामदेव केंद्रे (वय. ३६) व खाजगी इसम शंकर दत्ता टुले (वय ३३, रा.मीरवडी,दौंड) यांना अटक करण्यात आली आहे.
तलाठी यांच्या विरोधात तक्रारदाराने दिलेल्या तक्रारी नुसार, तक्रारदार यांची शेत जमीनीच्या सातबारा पत्रकावर भोगवटा वर्ग २ चा शेरा आहे. संबंधित अधिकाऱ्यांच्या आदेशाने शेरा कमी करण्याचे आदेश असताना सातबारा पत्रकावरील शेरा कमी करण्यासाठी तलाठी व खाजगी इसम यांनी तक्रारदार यांना लाचेची मागणी केली होती. यावेळी तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे लेखी तक्रार केली होती. या अनुषंगाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दहिटणे येथील तलाठी कार्यालयात सापळा रचला होता.
तेव्हा तलाठी कुंडलिक नामदेव केंद्रे यांनी तक्रारदाराकडे ३५ हजार रुपये लाचेची मागणी केली होती. तडजोडीनंतर ३० हजार रुपये देण्याचे ठरले होते. दरम्यान, तक्रारदराने ७ जुलै रोजी लाच लुचपत प्रतिबंध विभागाकडे तक्रार दिली होती. त्यानुसार पडताळणी करून लाचेची ३० हजार रुपये स्वीकारताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून तलाठी कुंडलिक नामदेव केंद्रे यांना रंगेहाथ पकडले. पोलीस अधीक्षक राजेश बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई पोलिस निरीक्षक भारत साळुंखे, पोलीस निरीक्षक शिराम शिंदे, पोलिस शिपाई भूषण ठाकुल, अंकुश आंबेकर, उपस्थित होते. दरम्यान, तलाठी व खाजगी इसम यांच्यावर यवत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम चालू आहे.