मलठण ता.दौंड येथे अवैध गावठी दारूभट्टी उद्धस्त : पुणे ग्रामीण एलसीबी पथकाची कारवाई

दौंड प्रतिनिधी :- आलिम सय्यद

दौंड तालुक्यातील मलठण गावातील चव्हाण वस्ती येथे अवैध गावठी दारू हातभट्टी धंद्यावर छापा टाकून दारूभट्टी उध्वस्त करून दोघांवर कारवाई केल्याची माहिती पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांनी दिली.
पुणे जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख यांनी जिल्ह्यातील अवैध धंद्यांवर कारवाई करणे बाबत स्थानिक गुन्हे शाखेला आदेश दिले होते. त्यासाठी विशेष मोहिम राबवित असताना, स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला गोपनीय खबऱ्या मार्फत मिळालेल्या माहिती वरून मलठण गावचे हद्दीत चव्हाणवस्ती ता.दौंड जि.पुणे येथे विहिरीचे कडेला असलेल्या गावठी दारूचे भट्टीवर छापा टाकला असता इसम नामे १)निलेश जगन्नाथ लोंढे व २)गणेश मारुती शेंडगे दोघे रा.मलठण ता.दौंड जि.पुणे हे दोघे २०० लिटर मापाचे १८ प्लास्टीकचे बॅरल त्यामध्ये भरलेले ३६०० लिटर कच्चे रसायन व ५०० लिटर मापाची एक लोखंडी पत्र्याची टाकी त्यामध्ये ४०० लिटर कच्चे रसायन असे एकूण ४००० लिटर कच्चे रसायन किं.१,२०,०००/- व इलेक्ट्रीक ब्लोअर, पाण्याची मोटर तसेच इतर साहित्य किं.रु. १६,४००/- असा एकूण कि.रु.१,३६,४००/- (एक लाख छत्तीस हजार चारशे रु.) चे मालासह हातभट्टी दारूची भट्टी लावुन गावठी दारू गाळत असताना पोलीसांची चाहुल लागलेने तेथुन झाडाचे आडोशाने काटवणातून पळून गेले. त्या दोघांचे विरूध्द दौंड पोलिस स्टेशनला मुंबई दारूबंदी कायदा कलम ६५(फ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. सदर दाखल गुन्ह्याचा पुढील अधिक तपास दौंड पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नारायण पवार हे करीत आहेत.
सदरची कारवाई ही पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख यांचे आदेशाने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांच्या मार्गदर्शनाखाली सहा.पोलीस निरीक्षक सचिन काळे, महेश गायकवाड, निलेश कदम, सचिन गायकवाड, सुभाष राऊत, गुरु गायकवाड, अभिजित एकशिंगे यांनी केलेली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!