पालघर जिल्हा युवक काँग्रेस च्या वतीने 11 जुलैपासून दिसेल – पेट्रोल- गॅस दर वाढी विरोधात स्वाक्षरी मोहीम. केंद्र सरकारचा नोंदवणार निषेध- सत्यम ठाकूर जिल्हा अध्यक्ष

Read Time:2 Minute, 15 Second

शिव प्रसाद कांबळे
डहाणू

पालघर जिल्हा युवक काँग्रेस च्या वतीने 11 जुलैपासून दिसेल – पेट्रोल- गॅस दर वाढी विरोधात स्वाक्षरी मोहीम. केंद्र सरकारचा नोंदवणार निषेध- सत्यम ठाकूर जिल्हा अध्यक्ष

पेट्रोल ,डिझेल अन्य जीवनावश्यक वस्तूंच्या च्या किमती गगनाला भिडल्या असून याकडे केंद्र सरकार दुर्लक्ष करत आहे. या वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्य माणसांचे कंबरडे मोडले आहे.
याकडे केंद्र सरकारचे लक्ष वेधण्यासाठी पालघर जिल्हा युवक काँग्रेस च्या वतीने
*युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष मान. सत्यजित दादा तांबे, जिल्हाध्यक्ष दिवाकर दादा पाटील, युवक प्रभारी मा.आदित्य जी सावळेकर* यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील सर्व पेट्रोल पंप,कामगार वसाहती, औद्योगिक वसाहती आदी ठिकाणी जिल्हा युवक काँग्रेसच्या वतीने 2 लाख सह्यांची मोहीम राबवून सह्यांचे निवेदन केंद्र व राष्ट्रपती यांना देण्यात येणार आहे
या दरम्यान जिल्ह्यात युवक काँग्रेस च्या वतीने प्रत्येक विधानसभा क्षेत्रात विरोध प्रदर्शन रॅली काढून केंद्राचा निषेध करण्यात येणार आहे. या आंदोलनात जिल्हा युवक काँग्रेस मधील युवक जिल्हाकार्याध्यक्ष मुद्दसर पटेल, राज्य प्रदेश युवक काँग्रेस पदाधिकारी,जिल्हा पदाधिकारी, सर्व युवक विधानसभा अध्यक्ष, तालुका अध्यक्ष व सर्व पदाधिकारी सहभागी होऊन केंद्राचा निषेध करणार आहेत.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!