शिवसेना शाखेतून जनतेचे प्रश्न सोडवा-जिल्हाप्रमुख महेश पासलकर..

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आदेशाने दौंड मध्ये #शिवसंपर्क_अभियानाची सुरवात

शिवसेना शाखेतून जनतेचे प्रश्न सोडवा-जिल्हाप्रमुख महेश पासलकर

दौंड प्रतिनिधी :- आलिम सय्यद,

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीच्या माध्यमातून जनहिताचे घेतलेले निर्णय व योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहचविण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख तथा राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सूचनेनुसार शिवसेना जिल्हाप्रमुख महेश पासलकर यांनी सर्व शिवसैनिक व पदाधिकारी यांना दौंड व इंदापूर विधानसभा मतदार संघात १२ ते २४ जुलै या कालावधीत शिवसंपर्क अभियान राबवण्यासाठी आवहान केले होते त्या अनुशंगाने आज शिवसंपर्क अभियानाची जोरदार सुरवात दौंड मधून करण्यात आली.
दौंड मध्ये शिवसंपर्क अभियानाची सुरवात करताना जिल्हाप्रमुख महेश पासलकर म्हणाले की,दौंड विधानसभा मतदार संघात गेल्या एक वर्षांपासून मोठ्या प्रमाणावर पक्षात इंनकमिंग सुरू असून, दौंड शिवसेनेत सुरू असलेले इंनकमिंग पाहता शिवसंपर्क अभियानाला दौंडमध्ये मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे.

पक्ष प्रमुखांनी सत्तेची चिंता करू नका शिवसेना घराघरात मनामनात पोहचविण्यासाठी तयार रहा असा आदेश दिलेला असून, त्याअनुषंगाने दौंड व इंदापूर विधानसभा मतदार संघातील शिवसैनिक व पदाधिकारी यांनी जोरदार तयारी केली आहे

शिवसंपर्क अभियानाकरिता वरिष्ठांनी दिलेल्या सूचनांनुसार प्रत्येक शिवसैनिकांनी मतदार संघातील प्रत्येक घरा घरात पोहचुन शिवसंपर्क मोहीम फत्ते करावी असे आवाहन पासलकर यांनी केले.

याप्रसंगी शिवसेना तालुकाप्रमुख देविदास दिवेकर, शिवसेना दौंड शहर प्रमुख आनंद पळसे, दौंड तालुका महिला संघटक छाया जगताप, स्वाती ढमाले,शिवसेना डॉक्टर सेल तालुकाप्रमुख प्रमोद रंधवे, कामगार सेना तालुकाप्रमुख चांद बादशाह शेख, उपतालुका प्रमुख नवनाथ जगताप, शिवसेना शहर संघटक अजय कटारे, शिवसेना महिला संघटक दौंड शहर दुर्गा सोनोने, विभाग प्रमुख काका परदेशी, अभिजित डाळिंबे, अजित फुटाणे, हनुमंत निगडे, उपविभाग प्रमुख डॉ.यशवंत धावडे, संजय आटोळे, शिवसेना उपशहरप्रमुख प्रसाद कदम,अक्षय घोलप,नितीन सलामपुरे, दीपक चीतारे, दौंड शहर विभाग प्रमुख गणेश झोजे, दत्ता मधुरकर, दत्ता राऊत, विनायक सोनोने, चेतन लवांडे, नासिर शेख, शिवसेना मलठण शाखाप्रमुख आबासाहेब देवकाते, पेडगाव शाखाप्रमुख शेखर शितोळे, देऊळगाव राजे ग्रामपंचायत सदस्य बाबू पासलकर, वार्ड शाखाप्रमुख बबन शेंडगे, लक्ष्मण सरोदे, नारायण सूर्यवंशी, बापू पासलकर,शंकर ठोंबरे,संदेश भोसले,अविनाश काळे,रामकृष्ण बरडे, दशरथ वाळके, कैलास वाळके,रामदास जगताप, दिपक इंदलकर, दिपक नामघुडे व शिवसेनेचे माऊली आहेर, प्रशांत जगताप, शंकर शितोळे, नाना कांबळे, पांडुरंग वीरकर,सुनिल राठोड, निखिल साबळे, गणेश पळसे, निखिल पळसे, विकास आहेर, योगेश झोजे, शाकीर शेख, पराग मुसळे, देवा चव्हाण, नवनाथ सोनोने, मीना लोंढे व इतर शिवसेना युवासेना पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!